udayanraje bhosale narendra modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची सभा; ठिकाण अन् तारीखही ठरली

Udayanraje Bhosale Vs Shashikant Shinde : सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे, अशी सरळ लढत होत आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News : महायुतीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Chhatrapati Udayanraje Bhosale ) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची 30 एप्रिलला कराडला जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या नियोजनाबाबत सध्या तयारीला वेग आला असून, कराडमधील भाजपच्या कोअर कमिटीतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत मैदानाची पाहणी केली. सभेच्या नियोजनासाठी शनिवारी ( 20 एप्रिल ) साताऱ्यात कोअर कमिटीची बैठक होणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात ( Satara Lok Sabha Election 2024 ) भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) अशी सरळ लढत होत आहे. दोन्ही बाजूकडून स्टार प्रचारकांसह दिग्गज नेत्यांच्या सभांचे जोरदार नियोजन सुरू आहे. भाजपच्या वतीने उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे नियोजन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या 30 एप्रिलला कराडमध्ये ही सभा होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. शुक्रवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी कराडमधील मैदानांची पाहणी केली. दरम्यान, शनिवारी सातारा भाजप कार्यालयात प्रदेश निवडणूक प्रभारी निर्मलकुमार सुराणा यांच्यासोबत बैठक होणार आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले.

या बैठकीत सभेच्या नियोजनाची चर्चा होणार आहे. तसेच लवकरच सभेची नेमकी वेळ दिली जाणार आहे. त्यामुळे मोदींच्या कराडमधील सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT