Shashikant Shinde News : साताऱ्यात 'माथाडी' नेते समोरासमोर, पाटलांच्या 'त्या' आरोपाला शिंदेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

Shashikant Shinde News : "माथाडी कामगारांना छत्र आणि अधिकार शरद पवारांनी दिले आहेत," असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलं.
Shashikant Shinde narendra modi
Shashikant Shinde narendra modisarkarnaam
Published on
Updated on

नरेंद्र पाटील ( Narendra Patil) यांना सत्तेमध्ये बसवताना मी मदत केली आहे. आता त्यांनी जे काही आरोप केले आहेत, त्याला माथाडी कामगारच उत्तर देतील, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) यांनी दिलं. आपल्यावर होणारे आरोप हे राजकीय आहेत, असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलं. सातारा लोकसभेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर शशिकांत शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

नरेंद्र पाटील काय म्हणाले?

"सातारा जिल्ह्याचा लोकसभेचा तुतारीचा उमेदवार हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहात घोटाळा करतो, हे खूप लांच्छनास्पद आहे. त्याचे मला खूप वाईट वाटते. अशा व्यक्तीला उमेदवारी मिळत असेल, तर मग शरद पवार ( Sharad Pawar ) यांना आम्ही काहीच बोलू शकत नाही," अशी टीका आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील ( Narendra Patil ) यांनी शशिकांत शिंदेंवर ( Shashikant Shinde ) केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर शशिकांत शिंदे म्हणाले, "सातारा जिल्ह्यासाठी विकासाची दूरदृष्टी ठेवून काम करणार आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहाबाबत नरेंद्र पाटलांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही. माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील. त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलं होतं. माथाडी कामगार सक्षम असून, कोणाच्या मागे उभे राहायचं, हे त्यांना कळतं."

Shashikant Shinde narendra modi
Satara Lok Sabha Election 2024 : कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले; 'या' नेत्याच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

"माथाडी कामगारांना छत्र आणि अधिकार शरद पवारांनी दिले आहेत. माझ्यावरील आरोप राजकीय स्वरूपातून होत आहेत. त्याबाबत न्यायालयात जे होईल, ते मला मान्य आहे. राजकारणात कूटनीती होत असते, हा त्याचाच भाग आहे," असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं.

R

Shashikant Shinde narendra modi
Narendra Patil on Shashikant Shinde : 'त्या' घोटाळ्याकडे बोट दाखवत नरेंद्र पाटलांनी डागली शशिकांत शिंदेंवर तोफ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com