praniti shinde ram satpute
praniti shinde ram satpute sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Praniti Shinde News : "दोन-दोन खासदार निवडले, आता उपरा आणून ठेवलाय", प्रणिती शिंदेंची सातपुतेंवर टीका

Akshay Sabale

सोलापूर मतदारसंघात ( Solapur Lok Sabha Election 2024 ) भाजपनं 2014 पासून तीन उमेदवार बदलले आहेत. 2014 मध्ये शरद बनसोडे, 2019 मध्ये जयसिद्धेश्वर स्वामी आणि आता राम सातपुते यांना भाजपनं संधी दिली आहे. त्यामुळे सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते, अशी लढत होती. पण, सोलापुरात स्थानिक विरुद्ध उपरा उमेदवार, असा प्रचार सुरू आहे. यावरूनच काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्यावर निशाणा साधला आहे.

"दोन-दोन खासदार निवडले. मात्र, कामाच्या पाट्या कोऱ्याच आहेत. आता उपरा आणून ठेवलाय," असं म्हणत प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांनी राम सातपुतेंना ( Ram Satpute ) लक्ष्य केलं आहे. प्रणिती शिंदे आणि माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात महाविकास आघाडीची सभा पार पडली. तेव्हा प्रणिती शिंदे बोलत होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रणिती शिंदे म्हणाल्या, "सोलापूर 10 वर्षे मागे गेलं आहे. हे भाजपचं पाप आहे. दोन-दोन खासदार निवडले. पण, कामाच्या पाट्या कोऱ्या आहेत. अनुभव नसताना जनतेनं निवडून आणलं. दोघांनीही खासदारकी वाया घालवली. लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत. त्यांच्याच पक्षानं त्यांना निष्क्रीय असल्याची पावती दिली. पंतप्रधान असूनसुद्धा तीन-तीन वेळा उमेदवार बदलावे लागतात. ही शोकांतिका आहे."

"पहिला उमेदवार आणला तो बदलला. दुसरा बदलला आता उपरा आणला. जनतेच्या मतांची भाजपला किंमत राहिली नाही. जनतेबरोबर खेळी खेळली जात आहे. आता म्हणतात उमेदवाराकडे पाहू नका, पंतप्रधानांकडे पाहा. पण, दोन्ही खासदारांनी काय दिवे लावलेत? पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, उमेदवार कामाबद्दल बोलत नाहीत. 10 वर्षांत सोलापूरसाठी काय केले हे बोलत नाहीत. फक्त धर्म आणि जातपातीची कीड भाजपनं देशात आणली आहे," अशी टीका प्रणिती शिंदेंनी केली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT