girish mahajan sanjay raut sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sanjay Raut News : महाजनांना जळगावमध्ये जागा दाखवणारच; भाजपच्या 'संकटमोचकां'ना राऊतांचं आव्हान

Akshay Sabale

भाजपनं लोकसभेचं तिकीट नाकाराल्यानंतर जळगावचे खासदार उन्मेष पाटील ( Unmesh Patil ) आणि करण पवार ( Karan Pawar ) यांनी पक्ष सोडून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी करण पवार यांना जळगावची उमेदवारी घोषित केली. मात्र, भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांना जागा दाखविण्यासाठीच आम्ही जळगावमधून लढतोय, असं आव्हान खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी दिलं आहे. ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, "गिरीश महाजन ( Girish Mahajan ) हे एक मुंगेरीलाल आहेत. महाजनांनी जळगाव लोकसभेची जागा वाचवून दाखवावी. आतापर्यंत जळगाव लोकसभेची ( Jalgaon Lok Sabha Constituency ) शिवसेना लढत नव्हती. पण, गिरीश महाजन यांना जागा दाखविण्यासाठी आम्ही जळगाव लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव लोकसभा आम्ही जिंकतोय."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचे नेते, एकनाथ खडसे पुन्हा भाजपत परतणार आहेत. याबद्दल संजय राऊतांनी म्हटलं, "एकनाथ खडसे यांच्यावर भाजपनं आरोप केले होते, त्याचं काय? ही वेगळी वॉशिंग मशिन आली आहे का? खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. लोकांना हळू हळू त्याचं स्मरण होईल."

"मैत्रीपूर्ण लढत हा अत्यंत घातक शब्द आहे. सांगलीतील काही लोकांनी मैत्रीपूर्ण लढत हा मुद्दा काढला. मग, अख्या महाराष्ट्रात आणि देशात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. हे कोणाला परवडणार आहे का? मार्ग काढणं हाच त्यावरील उपाय आहे," असं संजय राऊतांनी सांगलीच्या वादावर भाष्य केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT