Girish Mahajan On Khadse : खडसेंच्या 'घरवापसी'वर गिरीश महाजनांची पहिली पण तिखट प्रतिक्रिया; म्हणाले...

Eknath Khadse Once Again Join BJP : मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं वैर सर्वश्रुत आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने एकमेकांवर हल्ले- प्रतिहल्ले चढवले जात असतात.एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाही.
Girish Mahajan, Eknath Khadse
Girish Mahajan, Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांचा दिल्लीचा दौरा झाला होता.या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीतच खडसेंच्या पुन्हा भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. पण आता खडसेंच्या स्वगृही परतण्यावर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलं आहे.

मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं वैर सर्वश्रुत आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने एकमेकांवर हल्ले- प्रतिहल्ले चढवले जात असतात.एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे नेते सोडत नाही.त्याच पार्श्वभूमीवर खडसे हे पुन्हा भाजपमध्ये परतण्यावर महाजनांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याचवेळी त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवरुन मोठा खळबळजनक दावा देखील केला आहे.

Girish Mahajan, Eknath Khadse
Loksabha Election 2024 : मराठा आरक्षण, दुष्काळ की राम मंदिर, सीएए; काय आहे मराठवाड्याचा मूड...?

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले,2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत हरिभाऊ जावळे यांचे देखील तिकीट खडसेंच्या आग्रहामुळेच कापले गेले असा दावा महाजन यांनी केला आहे. तसेच मी म्हणजे भाजप म्हणणारे त्यांचे काय झाले.आज त्यांच्याकडे काहीच नाही.त्यांना कुणी विचारत नाही असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जळगाव मतदारसंघात निवडून येण्यासारखी परिस्थिती असती तर उन्मेष पाटलांनी (Unmesh Patil) तिकीट घेतले असते. मात्र, परिस्थिती विरुद्ध आहे. म्हणून त्यांनी करण पवारांची निवड केली आहे. तुमची या मतदारसंघात ताकद होती, तुम्ही काम केले आहे तर स्वतः लोकसभा लढवायची होती, यांच्या त्याच्या खांद्यावर का बंदूक ठेवली अशा शब्दांत तिकीट कापल्यानंतर ठाकरे गटात गेलेल्या उन्मेष पाटलांचा चांगलाच समाचार घेतला.

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. यावर स्वत:खडसेंनी शिक्कामोर्तब करतानाच आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.खडसे म्हणाले, मी भाजपमध्ये प्रवेश करतोय.मी हे घर बांधले आहे, मी माझ्या घरात लवकरच परत जातोय.

(Edited By Deepak Kulkarni)

Girish Mahajan, Eknath Khadse
Loksabha Election 2024 : मुलाचा पराभव केलेल्या बारणेंचा प्रचार करण्याची अजितदादांवर वेळ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com