Kolhapur Loksabha Election sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : गल्ली सोडू नका, चौकात ठाण मांडा; ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांना नेत्यांच्या सूचना

Kolhapur Loksabha कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढत अत्यंत तुल्यबळ आणि अटीतटीची समजली जात आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha News : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा पुढील 24 तासात थंडावणार आहेत. उद्याचा दिवस हा सुपर संडे म्हणून ओळखला जाणार आहे. सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार असून पाच मे च्या सायंकाळी सहा वाजल्यापासून ते मतदानाच्या दिवसांपासून रात्रही वैऱ्याची असणार आहे. अशातच रात्रीस खेळ चाले, अशीच परिस्थिती कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात असणार आहे. प्रत्येक उमेदवाराने साम -दाम- दंड-भेद याच नीतीने पुढचा दोन दिवसाचा प्रचार छुप्या पद्धतीने असणार आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढत अत्यंत तुल्यबळ आणि अटीतटीची समजली जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये जवळपास जातीय समीकरणावर ही निवडणूक निश्चित समजली जात आहे. पण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे तगडे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासमोर आहे.

सध्या जनतेचा कौल शाहू महाराज यांच्या बाजूने झुकलेला दिसत असला तरी हे वरवरची हुलकावणी समजली जाते. महायुतीचे उमेदवार आणि त्यांच्या मागे असलेली नेत्यांची फौज खासदार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पारकाष्टा करत आहे. अशातच रविवारी प्रचार थांबल्यानंतर मंगळवारी मतदान पार पडणार आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दोन्ही उमेदवाराकडून प्रचारांचा जोर धरला आहे.

आरोप प्रत्यारोपांच्या पायऱ्या, आश्वासनांचा पाऊस, प्रलोभनाचा दाखवलेला मोह आशातच प्रचाराचा महिना निघून गेला. मात्र येत्या दोन दिवसात दोन्ही उमेदवारांकडून सर्व निवडणूक आणि राजकीय नीतीचा वापर केला जात असल्याचेही दिसून येत आहे. प्रसंगी मतदारांवर लक्ष्मी आणि कुबेरांच्यां आशीर्वादाची तयारी ही दोन्ही बाजूने ठेवण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

आज रात्रीपासून या जोडण्या सुरू झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना गल्लीत आणि चौकातच थांबण्याचे आदेश स्थानिक नेत्यांनी दिले आहेत. आचारसंहितेंचा उल्लंघन करून प्रचार करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी दोन्हीकडचेही कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यामुळे रात्र जागून काढण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांचे सुरू झाले आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT