Kolhapur News : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता प्रचार शिगेला पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे महविकास आघाडीचे नेते प्रचार सभा घेत असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) महाराष्ट्राच्या संस्कृती आणि सुसंस्कृत राजकारणात विभाजन करत आहेत. जे चांगले सरकार चालत होत ते संपवले, आयाराम गायराम राजकारण सुरु केले आहे. देशात मोदी यांच्याविरोधात लाट आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात त्यांना कळाले आहे. त्यामुळे त्यांनी प्रचार मुद्दे बदलले आहेत. समाज विभाजन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशातील जुन्या पक्षावर खालच्या भाषेत टीका करणे त्यांना शोभते का ? हिंदू मुस्लिम यांच्यात भांडण लावून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस (Congress) प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithla) यांनी केली आहे.
दहा वर्षात त्यांच्या सरकारचे अपयश आहे, पहिल्या आणि दुसऱ्या टप्यात त्यांना कळलं आहे कि इंडिया आघाडीचे सरकार येणार त्यांनी त्यांनी मुद्दे बदलले आहेत. बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ बाबत बोलणे टाळले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोरांचं आर्मीत जाण्याचं स्वप्न आहे. पण अग्निवीरमुळे अनेक तरुणांच्या स्वप्नावर पाणी फिरले. आमचं सरकार आलं तर अग्निवीर रद्द करू. सात वेळा ते महाराष्ट्रात आलेत, ते घाबरले आहेत, त्यांना समजले आहे की, आपला पराभव झाला आहे. ते पॅनिक झाले आहेत, ते घाबरले आहेत म्हणून ते सात वेळा आलेत, असेही त्यांनी सांगितले.
शाहू महाराज (Shahu Mahraj) यांचा विजय निश्चित आहे, मोदी यांनी जें काही सांगितले त्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. भाजप संविधान संपवणार आहे, ते संविधान बदलणार आहेत. सॅम पित्रोडा यांचे व्यक्तिगत मत आहे, काँग्रेसशी (Congress) त्यांचा संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"पंतप्रधान मोदी घाबरलेत'
पंतप्रधान मोदी भरकटले आहेत, पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यवर लोकांनी विचार केला पाहिजे. शरद पवार हे मोठे नेते आहेत, मोदी-शहा महाराष्ट्रला तूच्च समजतात. ते राज्याला घाबरले आहेत म्हणून त्यांची वक्तव्य सुरु आहेत. विशाल पाटील हे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(Edited By : Sachin Wghmare )