Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Loksabha 2024 : कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे? 'मविआ' उमेदवाराचा सस्पेन्स कायम

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi News : महाविकास आघाडीसमोर या लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे आव्हान असणार आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच रान उठवले आहे, तर महाविकास आघाडीच्या कोर्टात अजूनही शांतता आहे. केंद्रीय स्तरावर जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने सध्या तरी महाविकास आघाडीत शांतता असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून जागा वाटपाचा तिढा स्थानिक पातळीवर सुटला असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार संजय बाबा घाटगे, काँग्रेसचे बाजीराव खाडे, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके हे निवडणूक लढवण्यास तयार आहेत. येत्या दोन दिवसांत केंद्रीय स्तरावर जागावाटप फॉर्म्युला निश्चित होणार असून त्याची घोषणाही केली जाणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात हालचाली वाढल्या असून 'मातोश्री'वरुन निरोप आल्याने गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, संदीप नरके, डॉ. चेतन नरके मुंबईला सोमवारी रवाना झाल्याची माहिती आहे.  दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने सध्यातरी उमेदवार हा गुलदस्त्यात असल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aaghdi) असा तुल्यबळ सामना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला खिंडार पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील निर्णय राष्ट्रवादीची ताकद ही महायुतीच्या पारड्यात पडली आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीसमोर या लोकसभा मतदारसंघात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे मोठे आव्हान असणार आहेत.

तर महाविकास आघाडीची प्रमुख धुरा एकट्या माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या खांद्यावर असणार आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एका उमेदवारास संमती दिल्यास त्याला कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे एकमत झाल्यास वरील चौघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्याच्या घडीला महाविकास आघाडीत गोकुळचे संचालक चेतन नरके यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. अनेक इच्छुक उमेदवाराची घोषणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करतील पण मागील वर्षभरापासून नक्की याने प्रचारात आघाडी घेतली आहे. अभ्यासू युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पण काँग्रेसमधील काही नेत्यांचा त्यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार हे गुलदस्त्यातच आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT