Loksabha Election 2024 : 'मविआ'मध्ये मावळ ठाकरेंकडे; पक्षातील नेत्यांनी दिला ‘हा’ शब्द!

Shivsena News : मावळमधून लढण्यासाठी शिवसेनेत आणि शिवसेनेबाहेरील अनेक उमेदवार इच्छूक आहेत.
Shivsena-Uddhav Thackeray
Shivsena-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार निवडणूक लढवणार, हे आता स्पष्ट झाले आहे. 'मातोश्री'वर आज (25 डिसेंबर) मावळसंदर्भात एक बैठक झाली आणि त्यात मावळमधून शिवसेनेचाच उमेदवार पुन्हा निवडून आणण्यात येईल, असा शब्द आणि विश्वास शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. (In Mahavikas Aghadi, Maval Lok Sabha seat will go to Shiv Sena)

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून विविध राजकीय पक्षांकडून आढावा बैठका, रणनीती आणि डावपेच आखले जात आहेत. शिवसेना पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसंदर्भात तयारी केली जात आहे. मावळमधून एकत्र शिवसेनेचे श्रीरंग बारणे निवडून आले होते. पक्षातील फुटीनंतर बारणे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मावळमधून ठाकरे गटाकडून तगडा उमेदवार शाेधला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shivsena-Uddhav Thackeray
Shirur Loksabha : अजितदादांनी कोल्हेंना ‘टार्गेट’ करताच शिरूरसाठी विलास लांडेंनी दंड थोपटले..!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आज 'मातोश्री'वर मावळ लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्या बैठकीत एकमताने जो उमेदवार दिला जाईल, त्याला निवडून आणण्याचा विश्वास सर्वांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे, असे शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी सांगितले.

आमदार अहिर म्हणाले की, मावळमधून लढण्यासाठी शिवसेनेत आणि शिवसेनेबाहेरील अनेक लोक इच्छूक आहेत. ते आमच्या संपर्कात आहेत. त्यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः लवकरच बोलणार आहेत. मात्र, मावळमधून जो उमेदवार दिला जाईल, त्याला निवडून आणण्याचं आमचे काम असणार आहे, असा विश्वास आम्ही शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

Shivsena-Uddhav Thackeray
Adinath Sugar Factory : ‘सावंत, राम शिंदे अन्‌ नारायण पाटलांनी बारामती ॲग्रोला आदिनाथ मिळू दिला नाही’

दरम्यान, 'वंचित बहुजन आघाडी'चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा 'इंडिया' आघाडी आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीत प्रवेश याबाबतचा निर्णय पक्षातील आणि महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते घेतील. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत सहभागी होण्यापूर्वीची त्यांची मोदींवरची भाषणे आपण पाहिली तर पूर्वी त्यांची भूमिका काय होती, हे दिसून येते, असेही अहिर यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, दिशा सालियन प्रकरणात एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. या मागणीमुळे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचा स्वतःच्याच पक्षाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Shivsena-Uddhav Thackeray
Nagar Politics : संगमनेरला चांगल्या बॅट्‌समनची गरज, फिल्डिंगचं माझ्यावर सोडा; विखेंनी पुन्हा थोरातांना डिवचलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com