Purushottam Jadhav Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : आता माघार नाही! सातारा लोकसभेसाठी शिंदेंच्या शिलेदाराचा 'एल्गार'

Purushottam Jadhav News : साताऱ्याची भूमीत आम्ही आता अन्याय सहन करणार नाही, असं जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी म्हटलं आहे.

Vishal Patil

Satara Loksabha Constituency and Shivsena : राज्यात लोकसभा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसून महायुतीत भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादीत ओढाताण सुरूच आहे. सातारा लोकसभेसाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केला असून भाजपाकडून छत्रपती उदयनराजेंना तिकीट फायनल असल्याचे बोलले जात आहे.

तर शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार पुरूषोत्तम जाधव यांनीही तयारी सुरू केली आहे. सातारा लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच असल्याने लोकसभेला कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे शिलेदार पुरूषोत्तम जाधव यांनी स्पष्ट केले आहे. 

शिवसेनेचे (शिंदे गट) लोकसभेला इच्छुक असलेले पुरूषोत्तम जाधव मंगळवारी कराड येथे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्याच्यासोबत काकासाहेब जाधव, सुलोचना पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कराड येथील दत्त चाैकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही पुरूषोत्तम जाधव यांनी आभिवादन केले. तसेच यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरातील प्रितीसंगम बागेतील खेळण्याची तसेच बागेची पाहणी केली.   

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुरूषोत्तम जाधव म्हणाले, 'लोकसभेसाठी मी इच्छुक असून दोनवेळा ताकदीने निवडणूक लढलो आहे. सातारची जागा ही शिवसेनेची आहे. महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात शिवसेनेचा(shivsena) भगवा फडकेल असा मला आत्मविश्वास आहे. उदयनराजे माझे मित्र आहेत. लोकशाहीत संख्येला महत्व असून छत्रपती उदयनराजे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीतील सर्वजण विचार करतील आणि सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्याला उमेदवारी मिळाली तर काय हरकत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्यासारखा खासदार झाला तर लोकांचे प्रश्न सुटतील. त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून मला संधी दिली जाईल.'

आता अन्याय सहन करणार नाही  -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना यापूर्वीची सातारा लोकसभेची परिस्थिती आणि माझ्यावर झालेला अन्याय यांची कल्पना दिली आहे. गेल्या 2019 च्या पोटनिवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून अर्ज माघारी घ्यावा लागला. परंतु, सातत्याने आम्ही तरी अन्याय सहन का करायचा?, साताऱ्याची भूमीत आम्ही आता अन्याय सहन करणार नाही. आता पुन्हा पुन्हा माझ्यावर अन्याय होणार नाही, यांची दक्षता महायुतीचे नेते घेतील, असा विश्वासही पुरूषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला.   

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT