Sangli News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत, याचा गैरफायदा घेऊन जिल्हा नियोजन समितीमध्ये (डीपीसी) खासदार आणि आमदारांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. नियोजनच्या समितीच्या निधीवर लोकप्रतिनिधींनी डल्ला मारल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र पाटील यांनी केला. पूरबाधित शाळांचा निधी चक्कं पूरबाधित शाळा सोडून इतरत्र वापरल्याची टीका त्यांनी केली. (Latest Marathi News)
काँग्रेसचे पाटील पुढे म्हणाले, "निधी वाटप करताना भौगोलिक समानता असावी,असा नियम आहे. असे अनेक नियम धाब्यावर बसवून आमदार सध्या केवळ राजकारण करून सरसकट सत्ता नसणार्या गावावर अन्याय केला आहे. नागरी सुविधांच्या कामांसाठी पाच हजार आणि तीन हजार लोकवस्तीचा नियम आहे, परंतु पात्र आमदारांनी पात्र गावांना निधी न देता दुसर्याच गावांना दिला आहे. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा हक्क हिरावून घेतला जात आहे.
2021 च्या महापुरात जिल्हा परिषद शाळा, रस्ते बाधित झालेले होते, त्यासाठी शासनाकडून कोणताही निधी आलेला नव्हता, मात्र जिल्हा नियोजन समितीचा शिल्लक निधी या कामासाठी वर्ग केला. हा निधी वितरित करताना ज्या शाळा घ्यायला हव्या होत्या, त्या सोडून इतर शाळा घेण्यात आल्या आहेत. या यादीत केवळ दोनच शाळा पुरबधित आहेत. सर्वाधिक फटका बसलेले बोरगाव या यादीतून वगळण्यात आले आहे.
पूर आल्यावर प्रशासनाकडून पाहणी करून निधीची मागणी केली होती, त्यानुसार पालकमंत्री यांच्याकडून त्याच शाळेला खर्च होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी सध्या नाहीत, पूरहानीच्या निधीवर कुणाचाही हक्क नाही. विनाकारण आमदारांनी शिफारस केली आहे. नियोजन समितीवर निमंत्रित असणारे आमदार खासदार निधीचे (Fund) मालक झाले आहेत. त्यांनी प्रशासनाने सुचवलेल्या पुरबधित शाळा न घेता, दुसर्याच शाळांमध्ये वापरला आहे. या निधीवर आमदारांचे नियंत्रण कसे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मसुचीवाडी (ता.वाळवा) गावात शाळेची इमारत दोन वर्षांपूर्वी बांधकाम झालेली असताना, पुन्हा आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्याच शाळेला दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. दलित वस्ती, नागरी सुविधा हा हक्काचा निधी असताना आमदार, खासदार हे आम्ही निधी आणला म्हणून सगळीकडे मिरवत असल्याचा आरोप काँग्रेस (Congress) नेते पाटील यांनी केला.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.