माढा लोकसभेतील ( Madha Lok Sabha Election 2024 ) सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे उत्तम जानकर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मनधरणी करूनही उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते-पाटील ( Dhairyasheel Mohite Patil ) यांना पाठिंबा दर्शवत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात रान उठवलं आहे. रणजितसिंह निंबाळकर आणि सोलापूरमधील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पराभूत करण्याचा चंगच उत्तम जानकर यांनी बांधल्याचा दिसत आहे. शुक्रवारी ( 26 एप्रिल ) पंढरपुरात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या वेळी बोलताना जानकरांनी थेट भाजप सरकारला इशारा दिला आहे.
महायुतीत थांबलो नाही तर जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप उत्तम जानकर ( Uttam Jankar ) यांनी भाजपवर केला आहे. तसेच, मला अटक केल्यास दोन कोटी धनगर समाज तुरुंगाला वेढा देतील, असा इशाराही जानकर यांनी भाजप ( Bjp ) सरकारला दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उत्तम जानकर म्हणाले, "महायुतीत थांबलो नाही, तर जेलमध्ये टाकू अशी धमकी देण्यात आली आहे. असं राजकारण मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. पण, मला सरकारला सांगायचं आहे. ज्या दिवशी मला अटक केली जाईन, त्या दिवशी राज्यातील दोन कोटी धनगर समाज तुरुंगाला वेढा दिल्याशिवाय राहणार नाही."
"सोलापूर लोकसभेसाठी मी भाजपला तिकीट मागितलं होतं. पण, माझी फसवणूक करण्यात आली. या फसवणुकीचा हिशोब करण्यासाठी रणमैदानात उतरलो आहे," असं उत्तम जानकर यांनी सांगितलं.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. "दिल्ली आणि झारखंडमधील मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकावर टीका केल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यांना कारण नसताना तुरुंगात टाकण्यात आलं. विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी सत्ता घेता का? भाजप देशात हळूहळू हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे," असं शरद पवारांनी म्हटलं.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.