Madan Bhosale, Nitin Patil
Madan Bhosale, Nitin Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Wai : मदन भोसलेंसह त्यांच्या पै पाहुण्यांनी 'किसन वीर' खाल्ला....नितीन पाटील

Umesh Bambare-Patil

सातारा : किसन वीर कारखान्यासह खंडाळा सहकारी साखर कारखाना वारेमाप कर्जाद्वारे अडचणीत आणण्याचे महापाप कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांचेच आहे. ५७५ कोटींच्या कर्जाचा डोंगर मदन भोसले यांनी उभा केला. पण, कोडगेपणातून ते आमच्यावर आरोप करत आहेत. मदन भोसले व त्यांच्या पै पाहुण्यांनी 'किसन वीर' खाल्ला, असा घाणाघाती आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केला आहे.

खंडाळा कारखान्यावर आलेल्या जप्तीवरून मदन भोसलेंनी केलेल्या आरोपाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आज प्रतिउत्तर दिले. नितीन पाटील म्हणाले, खंडाळा कारखाना आम्ही १७ ऑक्टोबर २०१९ मध्ये तर किसन वीर कारखाना आम्ही १७ मे २०२२ ला ताब्यात घेतला. किसन वीर आणि खंडाळा दोन्ही कारखाने कर्जाच्या बोजामुळे बुडीत अवस्थेत आहेत.

पाच तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आम्ही या निवडणूका लढण्याचा निर्णय घेतला. खंडाळा सहकारी साखर कारखाना आणि किसन वीर कारखाना या संदर्भातील १८२ कोटी रुपयांची गुंतवणूक दाखवण्यात आली आहे. अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा किसन वीर कारखाना आहे. यापेक्षा जास्त क्षमतेचे कारखाने कमी पैशात उभे राहिलेत. अडीच हजार कॅपॅसिटी चा कारखाना ८० कोटीत उभा राहिला पाहिजे.

या कारखान्यासाठी पाच हजार रुपये दराने १४८ एकर जमीन देण्यात आली. या कारखान्याच्या उभारणीतच ६० कोटींचा भ्रष्टाचार झाला. मदन भोसले यांनी या कारखान्याच्या नरडीला नखच नव्हे तर अख्खे नरडेच खाल्ले आहे. खंडाळा कारखान्याला कुपोषित स्वरूपातच जन्माला घातले आणि त्याचे पाप आमच्या माथी मारले. किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर अडीचशे कोटीचे कर्ज आहे.

गेली सात वर्ष मदन भोसले यांना निम्म्या क्षमतेने सुद्धा प्रतिवर्षी उत्पादन घेत आले नाही. कारखान्याच्या उभारणीमध्ये ६० ते ६५ कोटींचा गोंधळ केल्यानेच हा कारखाना आजारी कारखाना म्हणून गणला गेला. २०२१ मध्ये निवडणूक लागली आणि कारखाना वाचण्यासाठी आम्ही पॅनेल टाकलं. मुळात आपण आर्थिक चुका करायच्या आणि त्याचे हिशोब आमच्या माथी मारायचे हा प्रकार निंदनीय आहे. आमच्यावर आरोप करणे म्हणजे मदन भोसले यांच्या कोडगेपणाचा अक्षरशः कळस आहे.

मकरंद पाटील यांनी सत्तेत आल्यापासून एक रूपयांचे एक कर्ज घेतलेले नाही. किसन वीर, प्रतापगड व खंडाळा कारखाना या तिन्ही कारखान्यांना ५७५ कोटींची नऊ ते दहा बँकांची कर्जे आहेत. साडेतीनशे कोटी रुपयांची देणी असून सहा कोटींचे उसाचे बिल द्यायचे आहे. ज्यावेळी आम्ही खंडाळा कारखाना ताब्यात घेतला, तेव्हा त्या कारखान्याची तिजोरी मोकळी होती. जीएसटी सुद्धा भरला नव्हता. कामगारांचा सहा कोटी रुपयांचा पीएफ सुध्दा भरला नव्हता.

असे सगळे कारनामे आम्ही जर मदन भोसले यांचे सांगितले तर दोनशे पानांचे पुस्तक तयार होईल. मदन भोसले आणि त्यांच्यापैकी पाहुण्यांनी हा किसन वीर पद्धतशीरपणे धुवून खाल्ला. आम्ही कारखाना वाचण्यासाठी आमचे राजकीय अस्तित्व पणाला लावले आहे. आम्ही सत्तेसाठी करत नाहीत. किसन वीर आणि खंडाळा हे दोन्ही कारखाने आर्थिक दुरावस्थेतून नक्कीच बाहेर काढू, दोन्ही कारखान्यांचा हंगाम नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा चालू करण्यात येईल, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT