Abhay Jagtap, Ranjitsinh Nimbalkar, Dhairyashil Mohite-Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha election : अभय जगतापांचे बंड शमले; रणजितसिंह निंबाळकरांच्या अडचणीत वाढ

Umesh Bambare-Patil

Madha Loksabha News : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अभय जगताप यांचे बंड शमविण्यात पक्षाला यश आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभय जगताप यांनी उमेदवारी भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. तसेच त्यांना भविष्यात संधी दिली जाईल, असाही शब्द अभय जगताप यांना दिला आहे.

त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच बंडाचा पवित्रा घेतलेले अभय जगताप यांचे बंड थोपविण्यात शरद पवार व जयंत पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताकदीत वाढ झाली असून, महायुतीचे उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यासंदर्भात अभय जगताप म्हणाले, राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्यानंतर अनेकांनी त्यांची साथ सोडली आहे. पण अशा वाईट परिस्थितीत खासदार शरद पवारसाहेबांना एकटे सोडणार नाही. त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आम्ही कायम ठेवणार आहोत. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी आमची ताकद लावणार आहोत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही सदैव शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत. जयंत पाटील यांनी माढा लोकसभेचा सर्व्हे केला होता. यामध्ये मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे त्यांनी माझी समजूत काढली असून, मला आणखी काम करण्याची गरज आहे.

Edited By : Umesh Bambare

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT