Madha Lok Sabha 2024 : डॉ. अनिकेत देशमुखांची माढ्यातून माघार; पवारांची भेट अन्‌ वरिष्ठ नेत्यांचा सल्ला मानला

Dr. Aniket Deshmukh News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपला जय श्रीराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या मतदारसंघातील उत्तम जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटीचे निमंत्रण दिले. फडणवीसांच्या भेटीनंतर जानकर हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह पवारांना भेटले.
Dr. Aniket Deshmukh-Dhairyasheel Mohite Patil
Dr. Aniket Deshmukh-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama

Solapur, 19 April : महाविकास आघाडीने आपल्यावर अन्याय केल्याचे सांगून माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर आपले बंड मागे घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेला सल्लाही त्यांनी मानल्याचे दिसते. त्यामुळे माढ्यात मोहिते पाटील यांनी जानकर यांच्यानंतर अनिकेत देशमुख यांनाही आपल्यासोबत कायम ठेवण्यात यश मिळविले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघ ( Madha Lok Sabha constituency) सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपला जय श्रीराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)प्रवेश केला. त्यानंतर या मतदारसंघातील उत्तम जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटीचे निमंत्रण दिले. फडणवीसांच्या भेटीनंतर जानकर हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह पवारांना भेटले. तो विषय संपत नाही तोच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेकापने माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यांच्या घोषणेने सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Aniket Deshmukh-Dhairyasheel Mohite Patil
Vijaydada Active in Politics : राष्ट्रवादीत प्रवेश करताच विजयदादा पुन्हा सक्रीय; सोपल, राजन पाटलांची घेतली भेट!

डॉ. अनिकेत देशमुख (Dr. Aniket Deshmukh) यांनी गेली दोन दिवस आपल्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी सायंकाळी महाविकास आघाडी आम्हाला गृहीत धरत आहे. महाविकास आघाडीत आमच्यावर अन्याय केला जात आहे, असे सांगून त्यांनी माढ्यातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली. जनतेला तिसरा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

दरम्यान, डॉ. अनिकेत देशमुख यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली. भाजप सोडून राष्ट्रवादी आलेल्या मोहिते पाटील यांच्याकडून तातडीने सूत्रे हलविण्यात आली. मात्र, डॉ. अनिकेत देशमुख यांनी पत्रकार परिषदेतच आपल्याला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आला आहे. पत्रकार परिषद झाल्यानंतर आपण त्यांना भेटायला जाणार असल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानुसार ते पवारांना भेटायला बारामतीत गेले होते. सोबत धैर्यशील मोहिते पाटीलही होते.

Dr. Aniket Deshmukh-Dhairyasheel Mohite Patil
Praniti Shinde's Property : प्रणिती शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत पावणे दोन कोटींची वाढ; अवघे 300 ग्रॅम सोने

डॉ. देशमुख यांच्या अपक्ष निवडणूक लढविण्याच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी तातडीने सूत्रे हलविले. प्रत्यक्ष डॉ. अनिकेत यांच्याशी संपर्क साधण्यात आला. वरिष्ठांनी दिलेला सल्ला आणि पवारांच्या भेटीनंतर डॉ. अनिकेत यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा मागे घेतली. तसेच, महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. आमच्या संस्थेचे काही विषय होते. तसेच माढा लोकसभा मतदारसंघात यापुढील काळात आम्हाला विश्वासात घेण्यात येईल, असे आश्वास दिल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी पवारांच्या भेटीनंतर सांगितले.

R

Dr. Aniket Deshmukh-Dhairyasheel Mohite Patil
Ajit Pawar-Harshvardhan Patil : भाजपच्या मेळाव्यानंतर अजितदादा-हर्षवर्धन पाटील यांच्यात डिनर डिप्लोमसी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com