Madha Lok Sabha 2024 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Loksabha News : 'फडणवीसांनी आम्हांला खूप मदत केलीय,त्यांनी सांगितलं असतं तर आम्ही धैर्यशील मोहितेंना...'

Deepak Kulkarni

Madha News : माढ्यात दिवसागणिक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना माढ्यातून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मोहिते पाटील अन् रामराजे निंबाळकर गट अस्वस्थ आणि नाराज आहे.याचवेळी या मतदारसंघात बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत.धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.पण आता याच जयसिंह मोहिते पाटलांनी मोठं विधान करुन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी गुरुवारी (ता.11) पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसली तरी पवारांनी मात्र, ते धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांची माढ्यातील उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याचवेळी आता माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे बंधू जयसिंह यांनी मोठं विधान केलं आहे.

जयसिंह मोहिते पाटील म्हणाले,देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला खूप मदत केली.त्यात शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता तेथे फडणवीस यांनी मदत केली. सुमित्रा पतसंस्थेचे एक हजार कोटी रुपये गेल्या 10 वर्षात परत केले,आता फक्त 55 कोटी राहिलेत. आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू आहेत.त्यामुळे आम्हाला इडी-बिडीची भीती नाही असं स्पष्ट करत पुढील राजकीय भूकंपाचे एकप्रकारे संकेतच दिले आहेत.

याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आधीच सांगितलं असतं तर आम्ही धैर्यशील मोहितेंना उभंच राहू दिलं नसतं,पण आता वेळ निघून गेली असल्याचं सांगतानाच आता माढा आणि बारामतीत यंदा महाविकास आघाडीचा गुलाल उधळणार असल्याचा दावाही ठोकला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचवेळी मोहिते पाटील म्हणाले, रणजितसिंह निंबाळकरांना (RanjeetSinh Nimbalkar) उमेदवारी देताना भाजपने पाच आमदार पाठीशी असल्याचं सांगितलं होतं. पण ती त्यांनी चूक केली. रणजितदादांना मंत्री करण्यासाठी थांबलो असतो तर मोहिते गट संपला असता असेही जयसिंह मोहिते पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT