Ajit Pawar, Mahadev Jankar, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Political News : राष्ट्रवादी कुणाची... महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितले

Mahadev Jankar राष्ट्रवादी कुणाची शरद पवार, की अजित पवार हे मी 10 मिनिटांत सांगितले असते, परंतु मी पंतप्रधान नाही, असेही महादेव जानकर म्हणाले.

Umesh Bambare-Patil

Satara Political News : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावर सुनावणी सुरू असून, याबाबत काय वाटते, यावर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, पक्षाचा संस्थापक कोण आहे आणि कोण फुटून गेलं आहे, हे सामान्य लोकांनाही कळतं. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कष्ट करणारा माणूस बाप तो बापच असतो. परंतु, मी टीकाटिप्पणी करत नाही, कारण अजित पवार मित्र आहेत. पवारसाहेब मार्गदर्शक आहेत. जेव्हा माझा जन्म नव्हता तेव्हा ते गृहमंत्री होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कराड येथे बळीराजा शेतकरी संघटना आणि रासप यांच्या माध्यमातून उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळावा, याकरिता कराड ते पाटण अशी ट्रॅक्टर रॅली काढली. या वेळी महादेव जानकर Mahadev Jankar यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये राष्ट्रवादी कोणाची NCP याविषयी त्यांना विचारले असता, त्यांनी सावध पण सूचक उत्तर दिले.

महादेव जानकर म्हणाले, राष्ट्रवादी कुणाची शरद पवार, की अजित पवारांची हे मी 10 मिनिटांत सांगितले असते. परंतु मी पंतप्रधान नाही. माझे 40 खासदार असतील, तेव्हा मी पंतप्रधान असेन तेव्हा लगेच या प्रश्नाचे उत्तर दिले असते.

सत्ता तो पारधी असतो, पंतप्रधानच सर्व फायनल करणार आहेत. परंतु, लोक हुशार झाले आहेत, पक्षाचा संस्थापक कोण आहे आणि कोण फुटून गेलं आहे. मुख्यमंत्री हे आहेत आणि कोण माईक बाजूला ओढून घेतोय, हे सामान्य लोकांनाही कळतं. Maharshatra Political News

महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कष्ट करणारा माणूस बाप तो बापच असतो. परंतु, मी टीकाटिप्पणी करत नाही. कारण अजित पवार आमचे मित्र आहेत. पवारसाहेब मार्गदर्शक आहेत, जेव्हा माझा जन्म नव्हता तेव्हा ते गृहमंत्री होते, असे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT