राज्य शासनाने गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश देत ७ दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास परवानगी दिली.
सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी वापर करण्याची मुभा, मात्र ध्वनीप्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळणे बंधनकारक.
Pune News : जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर गणेश उत्सवासंदर्भात अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सव शांततेच्या आणि आनंदाच्या वातावरणात पार पाडावा यासाठी प्रशासनाकडून काही नियमावली देखील बनवण्यात येत आहे. अशीच नियमावली ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाच्या वापरावर प्रशासनाकडून बनवण्यात आली आहे.
राज्यशासनाने गणेश उत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान 7 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापरता येणार आहे. त्या संदर्भात परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहे.
ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या 31 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशात बदल करण्यात आले आहेत. तर सुधारित आदेश देखील जारी करण्यात आला आहे. यानुसार गणेशोत्सवासाठी शनिवार (30 ऑगस्ट) ते शनिवार (6 सप्टेंबर) या एकूण 7 दिवसांच्या कालावधीत या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे.
याशिवाय नवरात्री उत्सवासाठी दोन दिवस (1 आणि ऑक्टोबर), ख्रिसमससाठी (25 डिसेंबर) आणि वर्षाअखेरसाठी (31 डिसेंबर) रोजीही या निर्बंधांना सूट देण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी देण्याच्या अनुषंगाने एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
ध्वनी प्रदुषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 व ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) चे पालन करण्यात यावे, झोनिंग प्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये. ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
प्रश्न 1: गणेशोत्सवासाठी ध्वनिक्षेपक वापरास किती दिवस परवानगी आहे?
उत्तर: ७ दिवस परवानगी आहे.
प्रश्न 2: ध्वनिक्षेपक कोणत्या वेळेत वापरता येईल?
उत्तर: सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत.
प्रश्न 3: आदेश कोणी जारी केला?
उत्तर: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी हा आदेश जारी केला.
प्रश्न 4: ध्वनिक्षेपक वापरताना कोणते नियम पाळावे लागतील?
उत्तर: ध्वनीप्रदूषण नियंत्रणासंबंधी नियम पाळावे लागतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.