Pune Ganeshotsav 2025: विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला; 'या' मुद्द्यांवर झाली सहमती

Pune Ganeshotsav 2025: पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मानाच्या मंडळांसह सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत यावर तोडगा काढला.
Ganeshotsav 2025
Ganeshotsav 2025
Published on
Updated on

Pune Ganeshotsav 2025: गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत निर्माण झालेला वाद अखेर मिटला. मिरवणूक सकाळी साडेनऊ वाजता सुरू करून यंदाही परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने मिरवणूक काढण्याचा निर्णय सर्व मंडळांकडून एकमताने घेण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मानाच्या मंडळांसह सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेत यावर तोडगा काढला.

यंदा काही मंडळांनी नियोजित वेळेआधीच विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नवीन वाद निर्माण झाला होता. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांनी सर्व मंडळांची एकत्रित बैठक घेतली.

Ganeshotsav 2025
PMC Ward: पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये पेटणार शीतयुद्ध? काय आहे नेमकं कारण?

या संदर्भात मोहोळ म्हणाले, ‘‘पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेची चर्चा जगभरात होत असते. देशभरातून हा उत्सव पाहण्यास भाविक मोठ्या संख्येने येतात. अशावेळी नवीन विषय समोर येणे हे पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हिताचे नव्हते. याबाबत सर्व मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत सामोपचाराने आणि एकमताने निर्णय घेण्यास यश आले आहे’’

Ganeshotsav 2025
वाहन रजिस्ट्रेशन नियम बदलले! 15 ऐवजी 20 वर्षे वापरा गाड्या ; जाणून घ्या डिटेल्स

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा एक परिवार असून, प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. मात्र, हा विषय चर्चेतून सोडवला जाऊ शकतो, यावर माझा विश्वास होता. म्हणूनच सर्वांनी एकत्रित येत हा विषय मार्गी लावला आहे. सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे अभिनंदन, असंही यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

Ganeshotsav 2025
Rekha Gupta: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ, यावेळी...; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

बैठकीत झालेले निर्णय :

- मिरवणूक परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमानेच होणार

- सकाळी ९.३० वाजता मिरवणुकीस प्रारंभ होणार

- कोणतेही मंडळ स्थिर वादन करणार नाही

- मिरवणूक वेळेत संपविण्याची जबाबदारी सर्वच मंडळांवर

- दोन मंडळातील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com