
Mumbai News : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)गणेश मूर्ती आणि शाडू माती गणेश मूर्ती यांच्यातील वाद मुख्यतः पर्यावरण आणि विसर्जनाशी संबंधित आहे.पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमी सामाजिक संस्थांकडून दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी पीओपीच्या गणेशमूर्तींना तीव्र विरोध दर्शवला जातो.पीओपीच्या मूर्ती जल प्रदूषण करतात, असा आरोप करतानाच तर शाडूच्या मूर्ती पर्यावरणपूरक मानल्या जातात. यावर उच्च न्यायालयाने काही ठिकाणी पीओपीच्या मूर्तींना बंदी घातली होती.पण आता मुंबई उच्च न्यायालयानं Mummbai High Court ही बंदी उठवली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टानं सोमवारी(ता.9) एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयानं पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात नमूद केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांकडून स्वागत केलं जात आहे.
राज्य सरकारने (State Government) याआधी उच्च न्यायालयात आपली भूमिका मांडताना विशिष्ट परिस्थितीत पीओपीला परवानगी देणं शक्य असल्याचा दावा केला होता. समितीच्या शिफारशींचा अहवाल निर्णयासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं पाठवल्याचंही म्हणणं न्यायालयात मांडण्यात आलं होतं.
मुंबई उच्च न्यायालयानं या सुनावणीदरम्यान,उच्च न्यायालयानं राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती सादर करण्यात यावं अशा सूचना केल्या आहेत.
न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर अनेक मूर्तिकारांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्येही अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही.
पीओपीच्या मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरून जात नाहीत, ज्यामुळे जल प्रदूषण होते. शाडूच्या मूर्ती मात्र विसर्जनानंतर मातीत मिसळून जातात, ज्यामुळे पर्यावरणावर कमी परिणाम होतो. काही धार्मिक व सामाजिक मान्यतांनुसार, पीओपीच्या मूर्ती पारंपरिक विधींसाठी योग्य नाहीत, तर शाडूच्या मूर्ती पारंपरिक विधींसाठी अधिक योग्य मानल्या जातात.
याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी उच्च न्यायालयानं पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करणे यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. आता काही ठिकाणी या पीओपीच्या गणेशमूर्तींवरील बंदी उठवली आहे.
मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळे पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यास विरोध करतात.कारण त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो.ते पर्यावरणास अनुकूल विसर्जनाचे पर्याय शोधण्याचा आग्रह करतात. तर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणे आणि विसर्जनासाठी योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे.
काही ठिकाणी विसर्जनासाठी विशेष तलाव किंवा व्यवस्था बनवल्या जात आहेत. पीओपीच्या मूर्ती स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. ज्यामुळे त्यांना जास्त मागणी असते. तर दुसरीकडे शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी जास्त वेळ आणि कौशल्य लागते,त्यामुळे त्या जास्त महाग असतात. त्या या मूर्तींना मागणी कमी प्रमाणात असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.