Chhagan Bhujbal, Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : जयंत पाटलांनी भुजबळांचं नाव आणखी एका मोठ्या पदासाठी केलं पुढं!

Chhagan Bhujbal Takes Oath as Cabinet Minister : छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी भुजबळांसाठी आणखी एका पदाची थेट मागणीच केली आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, सुरुवातीला त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. आता त्यांना घेण्यात आले आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना याचा आनंद झाला असेल. छगन भुजबळ यांना खूप अनुभव आहे आणि मंत्रिमंडळाला अनुभवाची गरज असल्याने त्यांना घेतलं असेल. 

रायगड आणि नाशिक मोठे जिल्हे आहेत. नाशिक मध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला हवे होते. मात्र सरकारने याच जिल्ह्याचा निर्णय प्रलंबित ठेवलाय. छगन भुजबळांसारखा मोठा माणूस येथे आला आहे. त्यामुळे त्यांनाच आता पालकमंत्री करावे लागेल, खोचक सल्लाही जयंत पाटील यांनी दिला. छगन भुजबळ यांच्याबरोबर शरद पवार गटाचे दोन व्यक्ती शपथ घेणार म्हणणं हा पोरखेळ असल्याचे पाटील म्हणाले.

पक्षांतर्गत मोठे बदल होणार आहेत. पण विलीनिकरणाचा विषय तुम्ही चालवत आहात, आम्ही नाही, असे सांगत पाटील यांनी विलीनिकरणाच्या चर्चेवर पडदा टाकला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना जयंत पाटील यांनी, निवडणुकीत शक्य असेल तिथे आम्ही एकत्रित जावू, असे सांगितले. 25, 26, 27 तारखेला प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये सर्व चर्चा होतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बीड जिल्ह्यात अतिशय गंभीर आहे. वाटत होतं की काही बदल केल्यानंतर परिस्थिती बदलेल. पण तिथल्या लोकांना पोलिसांची जरब बसलेली नाही. आज ही मारहाण होत असेल आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतील तर गुन्हेगारांचे प्रचंड धाडस आहे. बीडला बदनाम करण्याचं काम काही स्थानिक आणि गुंड लोक करत असल्याची खंत जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

गेल्या दोन दिवसांपासून गोकुळ दूध संघावरून झालेल्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष आणायचा असेल तर त्यांचे नेते प्रयत्न करतील. सध्याचे सरकार सत्तेसाठी सर्व मार्गांचा वापर करत आहे, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी लगावला.

अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ताबडतोब शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला पाहिजे. कारण यंदा शेतातल्या पिकासोबत कापणी झालेल्या पिकाचे देखील नुकसान झालेले आहे. तत्काळ पंचनामा करून मदत करण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT