Sanjay Raut  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maha Aghadi's Solapur Formula : महाविकास आघाडीचा ‘सोलापूर फॉर्म्युला’ संपूर्ण महाराष्ट्रात नेणार; शिवसेना नेत्याची घोषणा

Sanjay Raut News : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्याचे काम गुजरात लॉबीने केले.

विश्वभूषण लिमये

Solapur News : महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी एकत्र राहून महाराष्ट्रात सध्या जे विष पसरले आहे, ते आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका या निवडणुकीच्या माध्यमातून नष्ट करायचं आहे. तीनही पक्षांनी एकत्र येऊन हे ठरवलं आणि हे शुभसंकेत आहेत. सोलापूरचा हा फॉर्म्युला संपूर्ण महाराष्ट्रात जायला पाहिजे, हा संदेश मी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना देणार आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. (Mahavikas Aghadi's 'Solapur Formula' will be taken to entire Maharashtra: sanjay raut)

महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या सोलापुरातील नेत्यांची बैठक राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला तीनही पक्षांचे सोलापुरातील प्रमुख नेते उपस्थित होते. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी वरील भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील पक्षांनी जिल्हा स्तरावर एकत्र येऊन समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन करावी. त्याला आता आणखी गती आली आहे. मात्र, अचानक सोलापूरला तो योग जुळून आला आहे. महाराष्ट्रात जे विष परलेले, ते नष्ट करण्यासाठी तीनही पक्षांनी एकत्र येऊन ठरवलं, हे शुभसंकेत आहेत. सोलापूरचा हा फॉर्म्युला संपूर्ण राज्यात गेला पाहिजे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही अच्छे दिन आणू शकलो नाही. आम्ही लडाखमध्ये घुसलेल्या चीनला बाहेर काढू शकलो नाही, विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांची घरवापसी करू शकलो नाही, हे त्या गुढीवर लिहिलं पाहिजे. भाजप हा पक्ष नसून इव्हेंट मॅनेजमेन्ट कंपनी आहे, असा टोला संजय राऊत यांनी राम मंदिर उद्‌घाटन सोहळ्यावरून भाजपला लगावला.

भारतीय पंचांगात गुढ्या उभारण्याची परंपरा आहे, भाजपने नवीन पंचांग काढलं आहे का..? पाडवा-दसऱ्याला आम्ही गुढ्या उभारू, त्यासाठी भाजपच्या आदेशाची आम्हाला गरज नाही. राम मंदिर म्हणजे भाजपची जहाँगिरी नाही. राम मंदिर हे हिंदूंच नव्हे; तर सर्वधर्मीयांचं प्रेरणास्थान आहे. रामाची मालकी जर भाजप घेत असेल तर ते रामाचे अवमूल्यन करत आहेत, असे राऊत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते मोदी गया तो गुजरात गया. पण, आता मोदी आया, तो देश गया अशी स्थिती आहे. देशातील लोकशाही मेलीय, हे लोकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही एका राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, असे आवाहन राऊत यांनी केले.

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकण्याचे काम गुजरात लॉबीने केले. जेव्हा गुजरात, यूपीमध्ये कोरोना काळात मृत्यूचे खच पडत होते, तेव्हा उद्धव ठाकरे लोकांचे जीव वाचवत होते. त्यांची लोकप्रियता यांना खुपली म्हणून त्यांनी सरकार पाडले, असा दावाही राऊत यांनी केला.

शरद पवार समोर बसलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हा प्रश्न निवडणूक आयोगाला पडला आहे. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याच खंजीरने यांचा कोतळा काढल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले की, राम सगळ्यांचा आहे. केवळ भाजपचा नाही. ते रामाचे मालक नाहीत. पण, रामाच्या नावाने राजकारण सुरू केले आहे. तेथे शिवसैनिक घुसले नसते, तर आज राम मंदिर उभे राहिले नसते. कारसेवेवेळी भाजपवाले पळून गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT