Solapur Politics : 'सोलापूरचे राजकारण 2024 मध्ये पूर्णपणे बदललेले दिसेल'

Sanjay Raut claim : बाळासाहेब आंबेडकर यांनीही संविधानाचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली आहेत.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : ॲड प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा जवळपास संपली आहे. संविधान वाचविण्याच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आघाडीवर असतील. आंबेडकरांची ताकद जेव्हा आम्हाला मिळते, तेव्हा महाराष्ट्रात नव्हे; तर देशात विजयाचा मार्ग मोकळा होतो. आम्ही सर्व एकत्र राहू, त्यामुळे सोलापूरचे राजकारणही 2024 मध्ये पूर्णपणे बदललेले दिसेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. (Solapur politics will be completely changed in 2024: Sanjay Raut claims)

सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघात झालेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी सोलापूरच्या राजकारणबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, सोलापूर म्हटलं की प्रकाश आंबेडकरांचा विषय निघतो. ते काय करणार, असा सवाल उपस्थित होतो. त्यांची मागील काही दिवसांतील भूमिका पाहिली, तर बाळासाहेब आंबेडकर यांनीही संविधानाचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली आहेत. हुकुमशाहीच्या विरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत. मोदींचा पराभव केल्याशिवाय संविधान आणि लोकशाही वाचणार नाही, असे त्यांचेही स्पष्ट मत आहे. संविधान वाचविण्याचे ओझं त्यांच्यावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
Madhya Pradesh Assembly Result : मध्य प्रदेशच्या निकालाबाबत शिवसेना नेत्याने व्यक्त केला संशय; पुराव्यासाठी पोस्टल मतदानाचा ट्रेंडच सांगितला...

पुण्यात अलिकडील काळात सभा होत नाही. मोदीही पुण्यात सभा घ्यायला धजावत नाहीत. पण, शिवसेनेची शनिवारी (ता. 9 डिसेंबर) मोठी सभा झाली. महाराष्ट्रातील जनतेचा कल, त्यांचा रोष या कालच्या सभेतून दिसून आला. आगामी 2024 च्या निवडणुकीत सोलापूरचे राजकीय चित्र बदलेले असेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच राहणार आहे. निवडणूक आयोगाला ज्यांची गुलामी करायची असेल ती त्यांनी करावी. राष्ट्रवादी काँग्रेसही शरद पवार यांचीच राहील. गेल्या 55-60 वर्षांत शिवसेना संपविण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. पण, शिवसेना संपली नाही. या वेळी तर चिन्ह आणि पक्षाचे नाव काढून घेण्यात आलं. तरीही शिवसेना उभी आहे. पक्ष असे सहज मोडता येत नाहीत.

Sanjay Raut
Raut Attack Modi-Shah : भाजप ही राजकीय पार्टी नसून मोदी- शाह यांची टोळी; संजय राऊतांचा हल्लाबोल

मोदी-शाह यांना तर अजिबात संपवता येणार नाही. देशाच्या इतिहासून मोदी-शाहसंपून जातील. कारण इतिहासात नोंद व्हावी, असं भरीव कार्य मोदी-शहांकडून झालेलं नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले

Sanjay Raut
Dr. Bharati Pawar : खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदावर नाव कोरणाऱ्या डॉ. भारती पवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com