MVA - Mahayuti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Vs MVA : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी होणार 'बिगफाईट', जिल्हा परिषदेतही उडणार धुरळा

Kolhapur Politics : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत मंगळवारी (ता.6) सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश देत आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात काढत येत्या चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले.

Rahul Gadkar

Kolhapur News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत मंगळवारी (ता.6) सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण आदेश देत आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात काढत येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर कोल्हापुरातील राजकीय हालचाली गतिमान होण्याला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे देखील जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सदस्य होण्यासाठी अनेक इच्छुकांची धडपड दिसून येत आहे.

या निवडणुकीवर देखील विधानसभा निवडणुकीचा परिणाम होणार असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक जुन्याच 67 प्रभागांमध्ये होणार आणि ओबीसींच्या 16 टक्के आरक्षणानुसारच होणार आहेत.

दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशानंतर एन पावसाळ्यात मतदारांना निवडणुकीचे रंग पाहता येणार आहेत. गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे. मात्र या निकालानंतर मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना कारभारी मिळणार आहेत. त्यामुळे गावागावांतील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे.

ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या साडेतीन वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा परिषदेवर देखील प्रशासक राज होते. मात्र आज झालेल्या सुनावणीनंतर तब्बल साडेतीन वर्षान या निवडणुका लागणार आहेत. मागील दोन वर्षांपासून इच्छुकांनी आपापला मतदारसंघ पिंजून काढला आहे.

मात्र, सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने इच्छुकांचे खिसे रिकामी झाले होते. निवडणकुीचे नोटिफिकेशन देणे, निवडणूक कार्यक्रम घेणे ही सर्व तयारी करावी लागणार आहे. तसेच, या निवडणुकीचे म्हणून गटनिहाय किंवा तालुकानिहाय आरक्षण जाहीर करावे लागणार आहे.

2022 मध्ये 76 गटांसाठी 27 टक्के आरक्षणानुसार सोडत जाहीर झाली होती. यावर आक्षेप घेतल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे 2022 ला झालेली आरक्षण सोडत रद्द करत नव्याने आरक्षण सोडत होणार आहे. यापूर्वी ज्या ठिकाणी आरक्षण पडले त्या ठिकाणची आरक्षण यंदा बदलणार आहे. त्यामुळे 67 गटांसाठी पुन्हा नव्याने आरक्षण सोडत घेतली जाईल. याबाबत निवडणूक कार्यालयाच्या नियोजनानुसार या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा मागील निवडणुकीत करिष्मा चालला. मात्र यंदा याला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढायच्या झाल्यास महाविकास आघाडी बॅक फुटवर जाणार आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य, ताराराणी पक्ष आघाडी, शाहू आघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल :

काँग्रेस 14

भाजप 14

राष्ट्रवादी 11

शिवसेना 10

जनसुराज्य 06

ताराराणी पक्ष आघाडी 03

स्वाभिमानी शेतकरी संघटना 02

शाहू आघाडी (राधानगरी) 02

युवक क्रांती आघाडी 02

कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी 02

अपक्ष 01

एकूण 67

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT