Amit Thackeray: राज यांच्यानंतर आता अमित ठाकरेचंही 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठं विधान; म्हणाले...

Operation Sindoor News : एकीकडे भारतीय सैन्याने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरेंनी मात्र, यावर नाराज नाही पण आनंदीही नाही अशी कोड्यात टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे.
Amit Thackeray On Opreation Sindoor .jpg
Amit Thackeray On Opreation Sindoor .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भारतीय सैन्य दलानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतानाच पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करत ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारण्यात आले आहेत. एकीकडे भारतीय सैन्याने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) मात्र, यावर नाराज नाही पण आनंदीही नाही अशी कोड्यात टाकणारी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात बुधवारी (ता.7) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत भाष्य केलं.ते म्हणाले, भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. पण पहलगाम हल्ल्यानंतर जेवढं दुःख मला झालं होतं, तेवढं समाधान आज मला मिळत नाहीये. कारण ते अतिरेकी अजूनही मोकाट फिरत आहे. पहलगाम हल्ल्यातील अतिरेकी अजूनही मोकाट फिरत आहे. म्हणून मला तो आनंद मिळालेला नाही. न्याय तेव्हा मिळेल, जेव्हा ते अतिरेकी हे मारले जातील, असंही अमित ठाकरे यांनी सांगितलं.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्ताननं देखील भारताला इशारा दिला आहे. यावर अमित ठाकरे म्हणाले, त्यांच्या नऊ ठिकाणी जाऊन आपण हल्ले केले आहे. आत्ता ते काय आपल्याला इशारा देतील. राजसाहेब ज्या पद्धतीने आज सकाळी बोलले की, युद्ध हे उत्तर नाही. ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला आहे, त्यांना ठेचून मारलं पाहिजे.

Amit Thackeray On Opreation Sindoor .jpg
Narendra Modi hint Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा चार तास आधीच खुद्द मोदींनी दिला होता संकेत; कुणालाच आला नाही लक्षात!

सामान्य लोकांचं ते का बळी घेत आहे. आपल्या सैन्याला सलाम असून त्यांना जे सांगितलं जात आहे ते करत आहे. पहलगाम हल्ल्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे, म्हणून मला तो आनंद अजून मिळालेला नाही, असं यावेळी अमित ठाकरे म्हणाले.

पहलगामच्या सुरक्षेबाबत अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ते अतिरेकी आत आले कसे हे आपण विचारायला नको का? त्यांनी आपल्या भारतात घुसून आपल्या लोकांना मारलं आहे. ते आलेच कसे? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. हे यंत्रणेचं फेल्युअर असून भारतीय सैन्याला सलाम आहे,असंही यावेळी अमित ठाकरे म्हणाले.

Amit Thackeray On Opreation Sindoor .jpg
Vijay Wadettiwar : काँग्रेसच्या वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्यानंतर केलेली 'ती' चूक 'ऑपरेशन सिंदूर'नंतर लगेचच सुधारली

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत अमित ठाकरे यांनी दोन भाऊ कधी एकत्र येतील,हे मला माहित नाही, असंही यावेळी अमित ठाकरे यांनी सांगितलं.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेलं नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील, असा धडा शिकवणं गरजेचं होतं.

अशावेळी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक अशा गोष्टी फायद्याच्या नाहीत, असं राज यांनी म्हटलं आहे. शिवाय पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश असून त्याला आणखी काय बरबाद करणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर यावेळी अमेरिकेने दहशतवादी हल्ल्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं याची आठवण देखील करून दिली.

ते म्हणाले, अमेरिकेत दहशतवाद्यांनी तीन टॉवर पाडले, तेव्हा अमेरिकेने त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारलं. त्यामुळे अशा हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते, त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातीलच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणं योग्य नसल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com