Operation Sindoor: खोटारडा पाकिस्तान! 'ऑपरेशन सिंदूर'नंतरचा 'तो' प्रचंड चीड आणणारा व्हिडिओ समोर, दहशतवाद्यांना थेट शहीदांचा दर्जा?

Operation Sindoor And Pakistan : लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरने अंत्यसंस्काराला जाणे आणि पाकिस्तानी सैन्य दलानेही उपस्थिती दर्शवणे हे पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेलं कनेक्शन जगजाहीर करत असल्याचे यावरुन दिसून येते.
OPERATION Sindoor And Pakistan .jpg
OPERATION Sindoor And Pakistan .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेतंर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी स्थळांवर जोरदार हल्ला चढवला. या 'एअर स्ट्राईक'मध्ये भारतीय हवाई दलाकडून दहशतवाद्यांचे प्रमुख 9 अड्डे उध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्करानं केलेल्या या कारवाईत 80 ते 90 दहशतवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) हल्ल्यानंतरही सुधारेल तो पाकिस्तान कसला असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण पाकिस्तानचा दहशतवादाविरोधातला पांघरलेला खोटारडा बुरखा टराटरा फाटला आहे.

पहलागाम हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्य दलानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यामुळे पाकिस्तान चवताळला असून भारतासोबत युद्ध पुकारण्याच्या वल्गना करण्यात येत असून सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे.

तर,यापूर्वी कायमच दहशतवाद्यांसोबत आपला संबंध कांगावा करणाऱ्या पाकिस्तानी (Pakistan) सैन्याचे अधिकारी आणि पोलिस आयजी बुधवारी (ता.7) हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांना शहिदांचा दर्जा देतानाच त्यांच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित असल्याचं दिसून आलं.

भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईत दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात मारले गेलेल्यांमध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झाला आहे. तसेच अझहरचा भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला आहे. असगरचा मुलगा हुजैफचाही यात समावेश असून असगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. यात इतर पाचजणही गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

OPERATION Sindoor And Pakistan .jpg
Amit Thackeray: राज यांच्यानंतर आता अमित ठाकरेचंही 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठं विधान; म्हणाले...

या हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर हाफिज अब्दुल राऊफ हा हवाई हल्ल्याच्या ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होता. या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्य दलातील काही अधिकारी आणि पोलीसही सहभागी झाल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे.

पाकिस्तानकडून सातत्यानं दहशतवादी कारवायांबाबत हात झटकले जातात.पण ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या लष्कर ए तोएबाच्या टॉप कमांडरच्या दहशतवाद्याच्या अंत्यसंस्काराला पंजाब पोलिसचे आयजी अधिकारी,पाकिस्तानी सैन्य दलाचे अधिकारी यांच्यासोबतच दहशतवादी हाफिज अब्दुल राऊफसह उपस्थित राहत नमाज अदा केला. लष्कर ए तोएबाच्या टॉप कमांडरने अंत्यसंस्काराला जाणे आणि पाकिस्तानी सैन्य दलानेही उपस्थिती दर्शवणे हे पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेलं कनेक्शन जगजाहीर करत असल्याचे यावरुन दिसून येते.

OPERATION Sindoor And Pakistan .jpg
Operation Sindoor: भारतानं पाकिस्तानसह कुरापती चीनचाही टप्प्यात आणून केला 'करेक्ट कार्यक्रम'; जैश-ए-महंमदचं 'नेटवर्क'च उडवलं

मुझफ्फराबादमधील दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पचा प्रमुख असलेला याकूब मुघल ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झाला. त्याच्याच अंत्यविधीला आयएसआय,पाकिस्तानच्या सैन्य दलातील अधिकारी, जवान उपस्थित राहिल्यानं दहशतवाद्यांशी असलेलं पाकिस्तानचं कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com