Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahesh Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या शिलेदाराने महाविकास आघाडीची कुंडलीच काढली; काय आहे मुद्दा ?

MVA Vs Mahayuti : वॉर्डची स्थिती बघा म्हणत शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंवर टीका

Vishal Patil

Satara Political News : राज्यात झालेल्या राजकीय गोळीबारांमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच मुंबईसह राज्यात गुंडगिरी फोफावली असून सरकार गुंडांना पोसत असल्याचा घणाघातही विरोधक करत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि नवनिर्वाचित कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदेंनी यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गुन्ह्यांची कुंडलीच काढली.

कोरेगाव येथे विकास कामांच्या लोकार्पण सोहळा आणि नागरी सत्कार कार्यक्रमात आमदार महेश शिंदेंनी (Mahesh Shinde) विरोधकांवर सडकून टीका केली. 'सध्या राज्याच्या राजकारणामध्ये नवीन टीका सुरू झाली आहे. राज्यात सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही? असा प्रश्न विचारला जातोय. मनसुख हिरेन यांना दिवसाढवळ्या खाडीत फेकून कोणी दिले? एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या? सुशांत सिंग राजपूतचा खून कोणी केला? दिशा सलियनला मारले ते लोक आज आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिकवायला लागलेत, अशी प्रश्नांची सरबत्तीच आमदार शिंदेंनी केली.

कोरेगाव भकास अन् खटावचा विकास

कोरेगाव केले भकास आणि खटावचा केला विकास, असा बोर्ड लावून माझ्यावर टीका केली जात आहे. जे 10 वर्षे आमदार आणि तुम्हीतर कॅबिनेट मंत्री होता. तुमची राज्यात आणि केंद्रात सत्ता होती. आता जे असे बोर्ड लावले होते, त्यांच्या वॉर्डात काय परिस्थिती आहे ते आधी बघा, असा टोला राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde), महेश शिंदेंनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोरेगाव ते एक्सप्रेस वे बाधायचा आहे. अवघ्या 35 मिनिटांत माणूस या एक्सप्रेस वे वरून गेला पाहिजे. त्यासाठी 285 कोटीचा निधी देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी मान्य केल्याचेही शिंदेंनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT