Uddhav Thackeray : आता 'आर या पार'ची लढाई! घोसाळकरांच्या मृत्यूनंतर ठाकरे गट आक्रमक

Abhishek Ghosalkar, Vivek Khamkar : पक्षाच्या अस्तित्वाची लढाई प्राणाची आहुती मागतोय, विवेक खामकरांची पोस्ट
Dombvili Poster
Dombvili PosterSarkarnama
Published on
Updated on

Dombivili Political News : दहिसर येथील गोळीबारात ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकरांचे चिरंजीव, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने फेसबुक लाईव्हदरम्यानच पाच गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिस यानेही गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. डोंबिवलीत घोसाळकरांना (Abhishek Ghosalkar) ठाकरे गटाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी लावलेल्या फलकांद्वारे आता लढाई अस्तित्वाची झाली असून ही लढाई प्राणाची आहुती मागत असल्याचे म्हटले आहे. यातून ठाकरे गट आता आर या पार च्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. यातून आगामी निवडणुकांत घमासान पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dombvili Poster
Lok Sabha Election 2024: होऊ दे खर्च..! पण लोकसभेसाठी उमेदवाराला खर्चाची मर्यादा किती?

ठाकरे गटाचे डोंबवली शहर प्रमुख विवेक खामकर (Vivek Khamkar) यांनी आपल्या सोशल मीडियासह शहरात फलकांद्वारे घोसाळकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी वापरलेल्या शब्दांनी राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या जात आहेत. या फलकावर "राह कुर्बानियों की न वीरान हो, तुम सजाते ही रहना नए काफिले, फतह का जश्न इस जश्न के बाद है, जिंदगी मौत से मिल रही है गले, बाँध लो अपने सर से कफन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो", असा मजकूर लिहला आहे.

यासह फेसबुकवर त्यांनी उभा महाराष्ट्र शिवसेनेच्या अस्तित्वाचा यज्ञ आता प्राणांची आहुती मागतो, मी तयार आहे... तुम्ही? असा प्रश्न करत डोंबवलीसह राज्यभरातील शिवसैनिकांनाही आवाहन केले आहे.

Dombvili Poster
Ajit Pawar Ncp : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दिली 'ही' शपथ; म्हणाले, "सार्वजनिक जीवनात..."

दरम्यान, शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. आता पुन्हा ठाकरे गटाचे सरकार स्थापन करण्याचा चंग बांधण्याचे आवाहनही खामकारांनी राज्यातील शिवसैनिकांना केले आहे. ते म्हणाले, ज्या दिवशी या राज्यावर पुन्हा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल तेव्हाच खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करेन, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. यातून खामकरांनी आगामी निवडणुकांत ठाकरे गटासाठी सर्व काही करण्यास तयार असल्याचेच सूचित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात आठवड्यात राजकीय नेत्यांकडून किंवा नेत्यांवर गोळीबारांच्या तीन घटना घडल्या आहेत. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. उल्हासनगर आणि दहिसर येथील झालेल्या गोळीबारानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यातच पुण्यातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला केला. यामुळे हे सरकार गुंडांना पोसत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गोळीबारांच्या घटनांनी राज्यात चिंतेचे वातावरण आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Dombvili Poster
Loksabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाची उडी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com