Gondia News : शिवसेनेचे संस्कार असल्याने तसे तर आपण कोणालाच घाबरत नाही. परंतु उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची आपल्याला भीती वाटते अशी प्रांजळ कबुली ठाण्याचे ढाण्या वाघ मानले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदियात दिली. निमित्त होते गोंदिया-भंडारा जिल्ह्यांचे शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे.
अध्यक्षीय भाषणात शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. मात्र यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भीती वाटते असे नमूद केले. उपराष्ट्रपतींबाबत आदरयुक्त भीती आहे असे ते म्हणाले. जगदीप धनखड पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. तेव्हा त्यांना कठोर स्वभावाचे राज्यपाल म्हणून ओळखले जात होते, असे शिंदे म्हणाले.
कायद्याचे उत्तम जाणकार म्हणून जगदीप धनखड यांचा नावलौकिक आहे. आता त्यांचा स्वभाव मृदुभाषी झाला आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपराष्ट्रपतींच्या या स्वभावाची आपल्याला आदरयुक्त भीती असल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत दिली. मृदुभाषी म्हणून ओळखले जाणारे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सर्वांना परिचित आहेत. त्यांना कायद्याचे सटीक व सखोल ज्ञान आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कठोर निर्णय घेतले, असे शिंदे यांनी सांगितले.
संविधानानुसार जे कायदे आहेत, त्याचे सक्तीने पालन करण्यास त्यांनी पश्चिम बंगाल सरकारला बाध्य केले. नियमांवर बोट ठेवत काम केले. त्यामुळेच त्यांची धास्ती पश्चिम बंगालच्या नेत्यांनी घेतली होती. नियमांपलीकडे कोणी वागत असेल तर धनखड यांनी आपल्या परखड स्वभावाने अशांना नेहमीच समज दिली आहे. आता ते उपराष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतींनंतर सन्मानाच्या बाबत त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. आता धनखड यांच्यात बराच बदल झाल्याचे सर्वांना जाणवत असल्याचे शिंदे म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संसदेच्या सभागृहात सदस्यांना ते सांभाळून घेतात. यासाठी त्यांनी काळानुरूप सहज बदल करून घेतल्योन नेत्यांना जाणवत आहे. संसदेच्या मागील हिवाळी अधिवेशनात लोकसभेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळात तब्बल 141 खासदारांना निलंबित करण्यात आले. निलंबनाची कारवाई केलेल्या एका खासदाराने संसदेच्या आवारात जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. खासदार कल्याण बनर्जी यांनी केलेल्या मिमिक्रीची पंतप्रधानांनी गंभीर दखल घेतली, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना फोन करत संसदेच्या बाहेर खासदारांनी केलेल्या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी ‘कोणताही अपमान मला माझ्या कामाचा मार्ग बदलण्यास प्रवृत्त करू शकत नाही’, अशी भावना धनखड यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केल्याचा अनुभव शिंदे यांनी सांगितला.
अशा मृदुभाषी उपराष्ट्रपतींची आपल्याला भीती वाटत असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. कामाच्या वेळी कठोर स्वभावाचा आपल्याला आदर वाटतो, असेही शिंदे म्हणाले. धनखड यांच्या कारकीर्दीने आपल्याला प्रेरणा मिळते, अशी स्तुतीही शिंदे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.