Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : सभापती निवडीपूर्वीच साताऱ्यात मोठी घडामोड : मंत्री जयकुमार गोरेंनी अचानक केली ZP इमारतीची पाहणी; भाजपच्या स्ट्रॅटेजीची पुन्हा चर्चा

Jaykumar Gore visit ZP Building : सभापती निवडणुकीपूर्वी जयकुमार गोरे यांनी सातारा झेडपीला अचानक भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून आगामी निवडीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 03 April : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीमुळे संपूर्ण राज्यात गाजली, त्यामुळे विषय समित्यांच्या सभापतिपदाच्या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेत एक महत्वपूर्ण घटना घडली असून ग्रामविकास मंत्री तथा अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची सूत्रे हलविणारे जयकुमार गोरे यांनी अचानकपणे जिल्हा परिषदेस भेट दिली.

मुख्य इमारतीच्या काही भागांची पाहणी केल्यानंतर जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे मागील बाजूस असणाऱ्या डीआरडीए विभागात जाऊन काही काळ थांबले होते. त्यामुळे सभापती निवडीस दोन दिवसांचा कालावधी राहिलेले असतानाच गोरेंनी केलेला जिल्हा परिषद दौरा चर्चेत आला आहे.

बहुमत नसतानाही सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. मात्र, त्यावेळी झालेल्या गोंधळामुळे तसेच दोन जिल्हा परिषद सदस्यांना मतदान करू न दिल्याने मोठा गहजब निर्माण झाला होता, त्यामुळे सभापती निवडीकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सभापती निवडीस अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्हा परिषदेच्या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला जोर चढला आहे. गोरे यांचा हा दौरा राजकीय हालचालींचा भाग असल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अधिकच महत्त्वाची मानली जात होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अभूतपूर्व गोंधळ झाला होता. त्याची चर्चा राज्यभर होत असून महायुतीमधील तीन पक्षांमध्ये कलगीतुरा, आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडल्या जात आहेत. आता या निवडीनंतर येत्या शनिवारी (ता. ४ एप्रिल) सभापती निवडी होणार आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर गोरे यांच्या झालेल्या या झेडपीतील भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

आगामी सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर मंत्री जयकुमार गोरे यांची ही भेट केवळ प्रशासकीय होती की त्यामागे राजकीय रणनीती दडलेली आहेत, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा परिषद परिसर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे.

गोरे हे सायंकाळी पाचच्या सुमारास झेडपीत आले होते. काही वेळाने मुख्य इमारतींमधील काही ठिकाणी भेटी दिल्यानंतर ते मागील बाजूस असणाऱ्या डीआरडीए या विभागात जाऊन काही काळ थांबले होते, त्यानंतर ते विश्रामगृहाच्या दिशेने रवाना झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT