Kumar Ashirwad : मुख्यमंत्र्यांनी लाडक्या अधिकाऱ्याला नागपूरचे कलेक्टर केलेच; कोल्हापूर ZPचे सीईओ सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

S karthikeyan New Solapur Collector : कुमार आशीर्वाद यांची नागपूर कलेक्टरपदी बदली झाली असून एस कार्तिकेयन हे सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत, त्यामुळे प्रशासनात मोठा बदल झाला आहे.
kumar Ashirwad-S karthikeyan
kumar Ashirwad-S karthikeyanSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 April : लोकसभा, विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूरमध्ये बदली झाली आहे. नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आशीर्वाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आशीर्वाद यांच्या जागी कोल्हापूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन हे सोलापूरचे नवे कलेक्टर असणार आहेत.

कुमार आशीर्वाद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबूक’मधील अधिकारी मानले जात होते. त्यांची आता मुख्यमंत्र्यांनी स्वजिल्ह्यातच बदली केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला नागपूरला नेलेच, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्याचे सहसचिव सुभाष उमारणीकर यांनी कुमार आशीर्वाद यांच्या बदलीचे आदेश पारीत केले आहेत. कुमार आशीर्वाद हे 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 22 जुलै 2023 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. तीन वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राउंड असलेल्या नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

आशीर्वाद हे डॉ. विपीन इटणकर यांच्याकडून पदभार घेतील, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार देतील. गेल्या काही दिवसांपासून आशीर्वाद यांच्या बदलीची चर्चा सुरू होती, त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.

kumar Ashirwad-S karthikeyan
Anjangaon Statue Dispute : अंजनगावमधील पुतळ्याचा वाद मिटण्याचे संकेत; असा निघणार तोडगा...

सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत कुमार आशीर्वाद यांनी अत्यंत संयमाने आणि संवेदनशीलपणे विषय हाताळला होता. तसेच, सोलापूरची विमानसेवा मार्गी लागण्यात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा सिंहाचा वाटा होता. याशिवाय सोलापुरात आयटी पार्क उभारण्यातही आशीर्वाद महत्वाची भूमिका होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पंढरपूर कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पाऊले उचलली होती.

निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पाच सदस्यांच्या विशेष पथकासोबत ते कोलंबियाच्या दौऱ्यावर गेले होते.

kumar Ashirwad-S karthikeyan
Balraje Aware : लक्ष्मण हाके हा राजकीय दलाल; पुतळ्याला विरोध केल्यास रस्त्यावर कपडे काढून मारू : बाळराजे आवारेंचा इशारा

आशीर्वाद यांचा समावेश असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने ६ ते १० मार्चदरम्यान कोलंबियाचा दौरा केला होता. कोलंबियाच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करून या पथकाने आपला अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com