Satara News : राज्यात दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली होती. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार बाहेर पडले होते. त्यानंतर अजित पवार हे महायुती सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले होते. या पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संवाद जवळपास कमी झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका बैठकीत शरद पवार आणि अजित पवार भेटले होते. मात्र, काकांच्या बाजूला बसणे अजित पवारांनी टाळले होते. त्यानंतर शनिवारी झालेल्या सातारा येथील बैठकीत अजित पवार आणि शरद पवार हे एकत्रच आले नाही तर एकमेकांच्या शेजारी देखील बसले.
सातारा येथे शनिवारी रयत शिक्षण संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार या दोघांनीही हजेरी लावली. दोघांचीही आसनव्यवस्था एकमेकांच्या बाजूलाच करण्यात आली होती. आता या बैठकीतील काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आले आहेत. त्यामध्ये दोघेही एकत्रित दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे यावेळी या दोंघामध्ये काही संवाद झाला की, नाही याबद्दल माहिती समजू शकली नाही.
शनिवारी शरद पवार हे सातारा दाैऱ्यावर होते. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) हे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित रायगडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते देखील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला हजर झाले होते.
ही बैठक सुरु होण्यापूर्वी सुरूवातीला चर्चा होती की, अजित पवार हे सातारा येथील बैठकीला हजर राहणार नाहीत. मात्र, त्यांनीही हजेरी लावली. या बैठकीतील एक व्हिडीओ पुढे आला असून शरद पवार आणि अजित पवार हे आजुबाजूला बसल्याचे दिसत आहेत. या बैठकीप्रसंगी शरद पवार फाईल बघताना देखील दिसत आहेत. रायगड येथील अमित शहा यांचा दौरा झाल्यानंतर अजितदादा रयत संस्थेच्या बैठकीसाठी सातारा येथे आले होते.
दरम्यान, दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमास शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे यांनीही हजेरी लावली होती. जय पवार यांना आर्शिवाद देण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र आल्याचे बघायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच शरद पवारांना भेटण्यासाठी जय पवार आणि त्यांची होणारी पत्नी हे देखील गेले होते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.