Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना रायगडावर मानाचे पान; शेवटच्या क्षणी दिली भाषणाची संधी तर अजितदादांना मात्र...

Eknath Shinde Raigad speech: कार्यक्रमाच्या नियोजनानुसार यावेळी भाषण करणाऱ्याच्या यादीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नावे नव्हती. मात्र, ऐनवेळी नाराजीनाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आग्रहानंतर एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.sarkarnama
Published on
Updated on

Raigad News : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या शिवपुण्यतिथी अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाच्या नियोजनानुसार यावेळी भाषण करणाऱ्याच्या यादीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नावे नव्हती. मात्र, ऐनवेळी नाराजीनाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आग्रहानंतर एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली.

रायगडावरील कार्यक्रमात शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंना (Ekanath Shinde) भाषणाची संधी देण्यात आली. यावेळी सूत्रसंचालकानी भाषणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी फडणवीस यांच्या आग्रहानंतर ऐनवेळी एकनाथ शिंदेंना भाषण करण्याची संधी देण्यात आली. तसा आग्रह ऐनवेळी शिंदेंना करण्यात आला. त्यानुसार शिंदेंनी पाच मिनिटांत भाषण आटोपते घेतले.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Gokul Doodh Sangh : इच्छुकांचा गोकुळवर डोळा, आमदारकी नको पण संचालक करा, ऑक्टोंबरला बिगुल वाजण्याची शक्यता

या ठिकाणच्या कार्यक्रमाच्या प्रोटोकालनुसार खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरवातीला भाषण केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाषण करतील असा क्रमही ठरला होता. मात्र, ऐनवेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना रायगडावर मानाचे पान देत नाराजी नको म्हणून ऐनवेळी त्यांना भाषणाची संधी देण्यात आली.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
BJP Maharashtra : भाजपमध्ये जबरदस्त कोल्ड वॉर! मुनगंटीवारांना पुन्हा जड जातोय त्यांचाच पठ्ठ्या, सुरू झाला वादाचा नवा अंक

कार्यक्रमाप्रसंगी ऐन शेवटच्या क्षणी शिंदेंना भाषणाची संधी देण्यात आली. दुसरीकडे मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. नियोजित कार्यक्रमानुसार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती. मात्र, शिंदेंना संधी देण्यात आली तर अजितदादांना मात्र संधी देण्यात आली नाही.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Sudhir Mungantiwar Funny Speech : '...तर अर्ध्या आमदारांच्या बायका या हिरोईनी असत्या', सुधीर मुनगंटीवारांनी सांगितला 'तो' किस्सा

दरम्यान, या रायगडावरील कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार ही मंडळी भोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवास्थानी भोजनासाठी गेले होते.

Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis.
Sharad Pawar Solapur Tour : शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द; हे आहे कारण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com