Sangli News : सांगलीतील आटपाडी तालुक्यातील शिंदे गटाचे तानाजी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हणमंतराव देशमुख यांच्यातील राजकीय वाद उफाळला आहे. या वादातून त्यांच्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाच्या दालनात चांगलीच खंडाजंगी झाली. यामध्ये देशमुख यांनी तानाजी पाटलांनी आपापल्या जिवे मारण्याची धमकी दिल्याची पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. (Latest Political News)
आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्यावरुन जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे संचालक तानाजी पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांच्यात मोठा वाद झाला. संचालक मंडळाची सोमवारी दुपारनंतर बैठक होती. या बैठकीसाठी संचालक आले होते. ते अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या कक्षात चर्चा करीत बसले होते. या चर्चेदरम्यानच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि दोघेजण नाईक यांच्यासमोरच भिडले. हा वाद इतका वाढला की ते एकमेकांच्या अंगावरही धावून गेल्याची माहिती आहे.
बैठकीत नेमके काय झाले ?
हणमंतराव देशमुख यांनी बँकेच्या ताब्यात असलेला माणगंगा साखर कारखाना संचालक पाटील यांच्याशी सबंधित कंपनीला चालविण्यास देण्याबाबत तक्रार केली आहे. कोणत्या नियमाने कारखाना दिला अशी विचारणा केली. यावरुन संचालक तानाजी पाटील यांनी अध्यक्ष मानसिंग नाईक यांच्या केबीनमध्ये बसलेल्या हणमंतराव देशमुखांना माझ्याबद्दल तक्रारी का करतो, असे म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली. यातूनच पुढे वादावादी सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडल्याची माहिती आहे.
बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेतून बाहेर पडल्यानंतर हणमंतराव देशमुखांनी पाटील यांच्याविरुध्द जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांच्याकडे केली आहे. यामुळे देशमुख-पाटलांतील वाद पेटण्याची शक्यता आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.