Dr. Shirish Valsangkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी अटकेतील मनीषा मुसळे माने हिला जामीन मंजूर

Manisha Musale Mane Granted Bail : डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी सायंकाळी राहत्या घरी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला 19 एप्रिल रोजी रात्री अटक करण्यात आली होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 June : विख्यात मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेली वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आज (ता. 25 जून) जामीन मंजूर केला आहे. मुसळे माने हिला तब्बल 68 दिवसांनंतर जामीन मिळाला आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी सायंकाळी राहत्या घरी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर डॉक्टरांच्या पॅंटच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवरून हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला 19 एप्रिल रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती.

मनीषा मुसळे माने हिने दिलेल्या धमकीमुळे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचा मुलगा डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी मनीषा मुसळे माने हिला अटक केली होती.

आपल्याला कामावरून काढले तर दोन्ही मुलांना मारून मी जाळून घेऊन आत्महत्या करेन, अशी धमकी मनीषा मुसळे माने हिने डॉक्टरांना मेलद्वारे दिली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिला घरातील सर्व व्यक्तींसमोर याबाबतचा जाब विचारला होता. तेव्हा मनीषा मुसळे माने हिने माफी मागितली हेाती. मात्र, त्याच्या दुसऱ्या दिवशीच डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती.

सुईसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली होती. त्यानंतर तिच्या बॅंक खात्यातील बॅलन्सवरून पोलिसांनी आर्थिकदृष्टीनेही तपास केला होता. मात्र मुसळे माने हिचे वकिल प्रशांत नवगिरे यांनी हा आर्थिक गुन्हा नसून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आहे. तसेच, सुसाईड नोटही प्लाँट केली आहे, असे मुद्दे युक्तिवादात ॲड नवगिरे यांनी मांडले होते. सरकारी वकिल आणि मुसळे माने हिचे वकिल यांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी 25 जून ही तारीख दिली होती.

मनीषा मुसळे माने हिच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल न्यायालयाने आज (ता. 25 जून) जाहीर केला, त्यानुसार मनीषा मुसळे माने हिला जामीन मंजूर केला आहे. ती उद्या कारागृहाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे.

अटकेनंतर मनीषा मुसळे माने हिला तीन वेळा पोलिस कोठडी, तर तीन वेळा न्यायालयीन कोठडी मिळाली होती. जामीन मिळण्याच्या अगोदर ती न्यायालयीन कोठडीत होती. मनीषा मुसळे माने हिच्या वतीने ॲड. प्रशांत नवगिरे यांनी बाजू मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT