Manohar Bhosale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manohar Bhosale : व्यावसायिक भरभराटीसाठी पूजा करावी लागेल असे सांगून फसविणाऱ्या मनोहर भोसलेला पोलिस कोठडी

Police Custody : व्यावसायिक भरभराटीसाठी पूजा सांगून पैसे उकळणाऱ्या मनोहर भोसलेला माढा न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फसवणूक प्रकरणात तो पुन्हा अडचणीत आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 25 April : अडचणीत सापडलेल्या व्यावसायिकाला व्यावसायिक भरभराटीसाठी पूजा करावी लागेल, असे सांगून दोन लाख रुपयांची मागणी करत 50 हजार घेणारा मनोहर भोसले व त्याच्या साथीदाराला शुक्रवारी (ता. 24 एप्रिल) अटक करण्यात आली होती. त्याला आज माढा न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फसवणूक प्रकरणी सोलापुरातील (Solapur) व्यावसायिक गौतम कसबे यांनी गुरुवारी (ता. २३ एप्रिल) रात्री कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार मनोहर भोसले (वय ३६ रा. उंदरगाव, ता. करमाळा, सध्या रा. मांजरी पुणे) आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे (वय ३५ रा. मांजरी पुणे) या दोघांना कुर्डुवाडी पोलिसांनी शुक्रवारी पुण्यातून अटक केली होती.

व्यवसायात प्रगती होण्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून कसबे यांच्या मनोहरमामा भोसले (Manhor Bhosale) आणि त्याच्या साथीदाराने २ लाखांची मागणी केली होती. त्यातील ५० हजार रुपये कसबे यांनी भोसलेला दिले होते. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांना कुर्डुवाडी पोलिसांनी शनिवारी दुपारी माढा न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांनी दिली.

या कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. अन्य कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहे का, याबाबत तपास करण्यात येत आहे. यापूर्वी २०२१ मध्ये मनोहर भोसले विरुद्ध सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण पोलिसात विनयभंग, जादूटोणा यासारखे चार गुन्हे दाखल झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT