Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jarange Patils Fear : आता सरकार एक डाव टाकू शकतं; मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली भीती

Vijaykumar Dudhale

Solapur News : शांततेच्या आंदोलनाने आरक्षण निर्णायक टप्प्यात आणून ठेवलेलं आलं आहे. आता ही संधी सोडू नका. अशी संधी पुन्हा आपल्याला मिळणार नाही. मतभेद मिटवून एकत्र या आणि मराठा समाजाच्या पदरात आरक्षणाचे दान टाकण्यासाठी मदत करा. आरक्षण घेतल्याशिवाय मी तर एक इंचही मागे हटणार नाही, पण मराठा तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. (Manoj Jarange Patil expressed fear about the government)

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषण करणारे मनोज जरांगे हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. हुतात्मा स्मृती मंदिरात त्यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले.

जरांगे पाटील म्हणाले की, आता सरकार एक डाव टाकू शकते, त्यापासून दूर राहा. मराठ्यात गट, मतभेद होतात का, हे पाहिले जाईल. पण समाजात कोणतीही फूट पडू देऊ नका. तसा प्रयत्न केल्यास संबंधित नेत्याच्या त्याच्या पाया पडून सांगा, ‘तुम्ही आंदोलनात येऊ नका; पण आमच्या पोरांच्या अन्नात माती कालवू नका.’ आतापर्यंत सरकारचे सर्व डाव उधळून लावले आहेत. त्यामुळे यापुढेही सवाध राहावे.

जरांगे पाटील यांनी या वेळी आंदोलनावेळचे किस्सेही सांगितले. ते म्हणाले की, सरकारचे लोक आम्हाला पर्याय द्या, असे सांगायचे. म्हणजे पर्याय द्यायला आम्ही, आरक्षण मागणारे आम्ही, आंदोलन करणारे आम्हीच, मग तुम्ही काय करता. तरीही आम्ही पर्याय दिला. त्यानंतर त्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ म्हणाले, ‘आता जातो आणि दुरुस्ती करून आणतो. पण दोन तासांतच ब्रेकिंग आली. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या जीआरमध्ये सुधारणा. आम्ही तर डोक्यावरच हाणून घेतलं. आताच हे गेले.

निरोप आला की, शिष्टमंडळ अंतरवाली सराटीकडे येत आहे. आम्ही मराठे गोळा करेपर्यंत ते संभाजीनगरला आले. आले ते थेट व्यासपीठावर बसले. झालं तुमचं काम, उतरा खाली. मी म्हटलं घरी पाठवून द्यायची तयारी आहे की काय तुमची. त्यात काय आहे, हे आम्हाला वाचू द्या. वंशावळीच्या नोंदी असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे, हे वाचताच मी त्याला नकार दिला. आमच्याकडे वंशावळी नाहीत म्हणूनच आम्ही तुमच्याकडे कायदा करण्याची मागणी करतो आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारकडे माझ्या भाषेत समाजाची व्यथा मांडली. मला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले, विशेष विमानं पाठविण्यात आली होती. पण मी माझ्या जातीसाठी इंचभरही ढळलाे नाही. मी जिवंत असेपर्यंत माझ्या जातीशी गद्दारी करू शकत नाही. आपल्या टप्प्यात आल्यावर आपण दणकाच वाजवतो. आंदोलनादरम्यान डॉक्टर येऊन तपासायचे. एके दिवशी मला डॉक्टर म्हणाले की, तुम्हाला एक किडनीच नाही. आंदोलन संपल्यानंतर मी डॉक्टरांकडून जाऊन तपासणी केली, तेव्हा दोन्ही किडन्या सुस्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT