Madha Loksabha : 'मैं जो बोलता हूं, वही मैं करता हूं' ; खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे सूचक विधान

Ranjit Singh Naik Nimbalkar News : माढा मतदारसंघातील अनेक कामे मी खासदार झाल्यानंतर केली आहेत.
Ranjit Singh Naik Nimbalkar
Ranjit Singh Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Sangola News : नीरा देवघर प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (पीएमकेएसवाय) सामाविष्ट करण्याची शिफारस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या गुंतवणूक मंजूर समितीने केली आहे. त्यावरून श्रेयवाद रंगला आहे, पण सामाजिक कामात मी कधीच राजकीय विचार आणत नाही. माढा मतदारसंघातील अनेक कामे मी खासदार झाल्यानंतर केली आहेत. ‘मैं जो बोलता हूं, वही मैं करता हूं’ असे विधान माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. (Neera Deoghar Project included in Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana)

केंद्रीय जलसंपदा विभागाच्या अर्थ आणि गुंतवणूक समितीची नुकतीच दिल्लीत बैठक झाली. या बैठकीस जलशक्ती मंत्रालयाचे सचिव देबश्री मुखर्जी, उदय चौधरी, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता गुनाले, नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कोडुलकर आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

Ranjit Singh Naik Nimbalkar
Maharashtra Politics : अजित पवारांचीही आमदारकी जाणार; शिवसेना नेत्याचे मोठे विधान

खासदार निंबाळकर म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारसंघातील जनतेला मी शब्द दिला होता. नीरा देवघर प्रकल्पाच्या समावेशामुळे तो शब्द पूर्ण करण्यात मी यशस्वी झालो आहे. यामुळे दुष्काळी भागातील पण्याचा प्रश्नही मिटण्याची शक्यता आहे. काम करत असताना मी कधीही निवडणुकीपुरता विचार करत नाही.

नीरा देवघर प्रकल्प राज्य आणि केंद्र सरकारच्या भागीदारीतून पूर्ण करण्यात येणार आहे. यात राज्य सरकारचा हिस्सा हा ४० टक्के, तर केंद्र सरकार ६० टक्के रक्कम प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी देणार आहे. पैकी राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली असून, निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्याचे टेंडरसुद्धा झाले आहे, त्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरुवात होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ranjit Singh Naik Nimbalkar
Samarjitsinh VS Mushrif : मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, त्यांच्याशी संघर्ष अटळ; समरजितसिंहांचा रोखठोक बाणा

नीरा देवघरचा हा प्रकल्प ३ हजार ९६७ कोटी रुपयांचा आहे. उर्वरित ६० टक्के रक्कम केंद्र सरकारकडून मिळणार आहे. त्याचा लाभक्षेत्रातील माळशिरस तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोचविण्यासाठी उपयोग होणार आहे. याशिवाय लाभक्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या पंढरपूर, सांगोला दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे. मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी यापुढेही लढत राहणार आहे, असेही निंबाळकर यांनी सांगितले.

‘आमचं ठरलंय’बाबत नो कॉमेंट्स

मोहिते पाटील समर्थकांकडून लोकसभा निवडणुकीबाबत ‘आमचं ठरलंय....खासदाराचं’ अशी पोस्ट समाजमाध्यमांतून व्हायरल केली जात आहे. त्याबाबत खासदार निंबाळकर यांनी ‘नो कॉमेंट्‌स’ असे उत्तर दिले. मतदारसंघातील आणखी बरीच कामे मला करायची आहेत. कोण, काय, कशासाठी करतोय, बोलतोय हे मी कधीच बघत नाही. मी पक्षाने दिलेली जबाबदारी निश्चितपणे सांभाळण्याचा मनापासून प्रयत्न करीत आहे, असेही खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Ranjit Singh Naik Nimbalkar
Loksabha Election : लोकसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे मोठे पाऊल; ‘या’ नेत्यांची समिती घेणार निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com