Samarjitsinh VS Mushrif : मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, त्यांच्याशी संघर्ष अटळ; समरजितसिंहांचा रोखठोक बाणा

Kolhapur politics : हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर भाजप नेते समरजितसिंह घाटगे हे अडचणीत सापडतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी खास घाटगे शैलीत मुश्रीफांना ठणकावले.
Samarjitsinh Ghatge-Hasan Mushrif
Samarjitsinh Ghatge-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

राहुल गडकर

Kolhapur News : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे हे राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडतील, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र, त्यांनी खास घाटगे शैलीत मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांना उत्तर देत कागल विधानसभा मतदारसंघात मुश्रीफ विरुद्ध घाटगे संघर्ष अटळ असल्याचं दाखवून दिले आहे. घाटगे यांचे कोल्हापुरात आगमन होताच, त्यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर आगपाखड केली आहे. (Due to BJP's kindness, Mushrif got Kolhapur guardian minister post : Samarjitsinh Ghatge)

छगन भुजबळ आणि आदिती तटकरे वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना पालकमंत्रिपदाच्या जबाबदारीचे वाटप बुधवारी (ता. ४ ऑक्टोबर) करण्यात आले. त्यात हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. घाटगे यांच्याकडून मात्र त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला.

Samarjitsinh Ghatge-Hasan Mushrif
Loksabha Election : लोकसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे मोठे पाऊल; ‘या’ नेत्यांची समिती घेणार निर्णय

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, भाजपच्या मेहेरबानीमुळेच हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळाले आहे, हे त्यांनी विसरू नये. भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी चौकट ओलांडतील, त्या त्या वेळी मी त्यांच्या समोर उभा राहीन. हसन मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, पालकमंत्री तर सोडाच. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याशी माझा संघर्ष अटळ आहे. संघर्ष जितना बडा होगा, जित उतनीही शानदार होगी, अशा शब्दांत भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी प्रतिक्रिया दिली.

कागलच्या राजकीय आखाड्यात गेल्या काही वर्षांपासून पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यात उघडपणे राजकीय टोकाचा संघर्ष सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर मुश्रीफ आणि घाटगे यांच्यातील संघर्ष कमी होईल, असे अनेकांना वाटत होते.

Samarjitsinh Ghatge-Hasan Mushrif
Sanjay Raut News | पवारांवर आरोप करणाऱ्या फडणवीसांचा राऊतांनी घेतला समाचार | DCM Fadnavis |

भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांना पराभूत करूनच कागल मतदारसंघातून विजय मिळवेन, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यात मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद दिल्यानंतरही दोघांमधील राजकीय संघर्ष अटळ असल्याचे घाटगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागल विधानसभा मतदारसंघ केंद्रस्थानी आला आहे.

Samarjitsinh Ghatge-Hasan Mushrif
Sanjay Raut Criticized Fadanvis : दिल्लीनेच फडणवीसांचं मातेरं केलं; राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com