Rohit Patil-Jayshree Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Patil : आर आर आबांच्या मुलाविरोधात एकाच नावाचे तीन उमेदवार; जयश्री पाटलांपुढेही नवे संकट!

Tasgaon-Kavathe Mahankal Assembly constituency: रोहित पाटील आणि जयश्री पाटील यातून कसा मार्ग काढतात, हे पाहावे लागणार आहे. विरोधकांनी टाकलेल्या डावाला हे कसे उधळून लावतात की प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना फटका बसतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Vijaykumar Dudhale

Sangli, 31 October : विरोधकांच्या मतांमध्ये फाटाफूट व्हावी, यासाठी राजकीय नेते विविध माध्यमांतून प्रयत्न करत असतात. एकाच नावाचे उमेदवार निवडणुकीत रिंणगात उतरविणे, हा एक फंडा हमखास राबवला जातो. अगदी तसाच फंडा सांगली आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात राबविण्यात आलेला आहे. या दोन्ही मदारसंघात एकाच नावाचे प्रत्येकी तीन उमेदवार रिंणगात आहेत.

सांगली (Sangli) मतदारसंघात महायुतीकडून सुधीर गाडगीळ हे पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जयश्री मदन पाटील यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंणगात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार विशाल पाटील यांनीच पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळवून दिली आहे, अस समज मदन पाटील गटाचा झाला असून या गटाचे कार्यकर्ते त्वेषाने कामाला लागले आहेत.

सांगलीतून जयश्री पाटील (Jayshree Patil) नावाचे तीन उमेदवार सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. जयश्री पाटील यांना भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांच्याशी लढताना मतदारसंघातील इतर दोन उमेदवारांशी दोन हात करायचे आहेत. हे दोन्ही उमेदवार जयश्री पाटील या नावाचेच आहेत, त्यामुळे जयश्री पाटील यांना तीन आघाडीवर लढावे लागणार आहे.

सांगलीप्रमाणेच तासगाव कवठेमंहाकाळ या मतदारसंघातही एकाच नावाचे अनेक उमेदवार रिंगणात आहेत. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित आर. आर. पाटील (Rohit Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन पाटलांमधील वाद पुढच्या पिढीपर्यंत पोचला आहे. आर. आर. पाटील यांच्यासोबत लढणारे संजय पाटील यांना आरआर आबांच्या मुलाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे.

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात पुन्हा एकदा तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. त्यातूनच विरोधी मतांमध्ये फाटाफूट व्हावी, यासाठी रोहित पाटील नावाचे चार उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे रोहित पाटील यांना संजय पाटील यांच्याविरेाधात लढतानाच रोहित पाटील नावाच्या इतर तीन उमदेवारांशी सामना करावा लागणार आहे.

रोहित पाटील आणि जयश्री पाटील यातून कसा मार्ग काढतात, हे पाहावे लागणार आहे. विरोधकांनी टाकलेल्या डावाला हे कसे उधळून लावतात की प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना फटका बसतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT