Jayshree Patil : सांगली काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ; जयश्री पाटलांची कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढण्याची घोषणा

Sangli Congress : काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणार आहोत, अशी घोषणा जयश्री पाटील यांनी केली आहे. आपल्या पाठीशी आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे 20 नगरसेवक असल्याचाही दावाही जयश्री पाटील यांनी केला आहे.
Jayshree Patil
Jayshree PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli, 22 August : सांगलीत पुन्हा एकदा बंडखोरीची चिन्हे दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्याला तिकीट दिले नाही, तर आपण कोणत्याही परिस्थितीत अपक्ष निवडणूक लढवणार, अशी घोषणा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते जयश्री पाटील यांनी केली आहे. दुसरीकडे, याच मतदारसंघात काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसच्या तिकिटासाठी पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

सांगली विधानसभा मतदारसंघात ( Sangli Assembly Constituency) सध्या भाजपचे सुधीर गाडगीळ हे आमदार आहेत, त्यांच्या विरोधात केल्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्या निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांचा सुमारे 7000 मतांनी पराभव झाला होता,

त्यामुळे मागील निवडणुकीतील पराभवाचा वाचपा काढण्याच्या तयारीत पृथ्वीराज पाटील असतानाच जयश्री पाटील यांनीही याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यामुळे सांगलीच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवणार आहोत, अशी घोषणा जयश्री पाटील (Jayshree Patil) यांनी केली आहे. आपल्या पाठीशी आमदार विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे 20 नगरसेवक असल्याचाही दावाही जयश्री पाटील यांनी केला आहे.

Jayshree Patil
Ajit Pawar : ‘मी पुन्हा येईन’ चा शब्द अजितदादा पाळणार का?

एकीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी झालेली असतानाच आता विधानसभा निवडणुकीतही पुन्हा काँग्रेस पक्षांतर्गत बंडखोरीचा धोका दिसून येत आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष कोणाची समजूत काढणार आणि उमेदवारी कोणाला देणार, हे पाहावे लागणार आहे.

जयश्री पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून सांगलीतून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सांगली मतदारसंघातून त्या फिरतही आहेत, त्यामुळे जयश्री पाटील निवडणूक लढवण्याचा आपला दावा मागे घेण्याची शक्यता कमीच वाटत आहे.

Jayshree Patil
Somdatta Karanjekar : भाजप नाना पटोलेंना ‘होम ग्राउंडव’रच देणार धक्का; संघाच्या मुशीत घडलेला नेता विधानसभेला देणार टक्कर

मागील वेळी आम्ही पृथ्वीराज पाटलांना संधी दिली

विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात जयश्री पाटील म्हणाल्या, कोणत्याही परिस्थितीत मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. मागच्या वेळी पृथ्वीराज पाटील यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसमोर सांगितलं होतं की, यावेळी आम्हाला एकदा संधी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती.

एकदा आम्ही पृथ्वीराज पाटील यांनी संधीही दिली आहे, आम्ही त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांचे कामे केले आहे, त्यामुळेच त्यांना एवढी मते पडले आहेत. आता मी कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Chandrakant Patil, Vishal Patil, Jayant Patil
Chandrakant Patil warning office bearers
Chandrakant Patil
Vishwajeet 
kadam. Vishal Patil, Jayant Patil
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com