Maratha Reservation Agitation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांना मराठा आंदोलकांनी सुनावले; ‘...तरच आंदोलनात सहभागी व्हा’

Maratha Reservation News : दीपक साळुंखे यांनीही वेळप्रसंगी सर्व सोडून तुमच्यामध्ये मिसळेन, असे स्पष्टपणे सांगितले.

विश्वभूषण लिमये

Maratha Agitation News : बारामतीत मराठा समाजाच्या तीव्र विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव सहकारी सहकारी कारखान्याच्या मोळी टाकण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला. इकडे सोलापुरात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आलेले राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांना मराठा समाज बांधवांनी खडे बोल सुनावले. (Maratha protesters gave harsh words to the district president of Ajitdada group of NCP)

मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गाच्या ५० टक्केच्या आत मराठा समाजाला आरक्षणाची भूमिका मान्य असेल, तरच आंदोलनात सहभागी व्हा, असे मराठा आंदोलकांनी साळुखेंना सुनावले. त्यावर दीपक साळुंखे यांनीही वेळप्रसंगी सर्व सोडून तुमच्यामध्ये मिसळेन, असे स्पष्टपणे सांगितले. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवली सराटीत उपोषण सुरू केले आहे. गावोगावी नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात येत आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषण करण्यात येत आहे. दुर्दैवाने अनेक तरुण आत्महत्येसारखा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात धुमसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे हे आज सोलापुरातील मराठा आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले होते. त्यावेळी मराठा समाज बांधवांनी जिल्हाध्यक्ष साळुखेंना खडे बोल सुनावले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात ५० टक्क्यांच्या आतमध्ये आरक्षण मिळावं. या मागणीला पाठिंबा असेल, तरच आंदोलनात सहभागी व्हा अन्यथा होऊ नका, अशा स्पष्ट भाषेत सुनावलं.

मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हाध्यक्ष दीपक साळुखे यांनीही रोखठोक भूमिका मांडली. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोचवेन. वेळप्रसंगी सर्व सोडून तुमच्यात सामील होईल, असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर मराठा बांधवांचे समाधान झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT