Maratha Reservation Andolan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा समाजाचे गावोगावी साखळी उपोषण; सरकारला आणणार जाग

Jarange Patil जरांगे-पाटलांचा आदेश मानुन कऱ्हाड शहरासह तालुक्यातील गावा-गावात साखळी उपोषण सुरु केले आहे.

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Satara Political News : मराठा आरक्षणाचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग आणण्यासाठी आजपासुन महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरु करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले होते. त्यानुसार आज कऱ्हाड (जि.सातारा) शहरासह तालुक्यातील अनेक गावात साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहेत.

मराठा समाजाला Maratha Reservation ओबीसीमधुनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी महाराष्ट्रभर दौरे करुन जनजागृती करण्याची मोहिम हाती घेतली आहे. राज्यातील सर्वांत मोठा बहुसंख्य समाज असूनसुद्धा या समाजातील असंख्य युवक रोजगारापासून वंचित राहिलेले आहेत. यामुळे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागास राहिलेला आहे.

जरांगे-पाटील यांच्या कऱ्हाड (जि.सातारा) येथील जाहीर सभेत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरला अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर काय करायचे हे आपण सर्वजण ठरवु. मात्र सरकारला त्या तारखेची आठवण राहावी आणि आऱक्षण देण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या, यासाठी एक डिसेंबरपासुन गावोगावी साखळी उपोषण सुरु करा असे आवाहन केले होते. Maharashtra Political News

त्यानुसार आजपासुन गावोगावी साखळी उपोषण सुरु करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आज कऱ्हाड शहरातील साखळी उपोषणाची सुरुवात दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्याचबरोबर तालुक्यातील सैदापुर, खोडशी, मलकापुर परिसरासह तालुक्यातील अनेक गावात साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT