Solapur News : मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फायदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झाला आहे, तर भारतीय जनता पक्षाला दुहेरी तोटा झाला आहे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माढ्यात बोलताना केले. (Maratha reservation decision benefits Shinde's Shiv Sena; BJP's double loss : Prakash Ambedkar)
प्रकाश आंबेडकर हे माढ्यात ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी आले आहेत. त्या मेळाव्यापूर्वी माध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात झालेल्या निर्णयावर बोलताना दिला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मराठा समाजातील पुढारी पार झोपले आहेत. मराठा नेत्यांविषयी चीड निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविषयीची सहानुभूती वाढलेली आहे. ते सध्या मराठा समाजातील नेत्यांच्या वर आहेत. (Maratha Reservation Decision Benefit)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनातील लोक वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करीत होते, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढवली पाहिजे, असेही सांगत होते. आरक्षणाचा निर्णय न्यायालयात टिकेल, नाही टिकेल, हा वादाचा विषय आहे. पण, मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे मराठा समाजाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या रुपाने उभं राहिलं आहे, असं दिसतंय. दोन महिन्यांत ते मतदानाच्या स्वरूपातही दिसेल, असा दावाही आंबेडकर यांनी केला.
आंबेडकर म्हणाले, भारतीय जनता पक्ष या सर्व मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान ओबीसींना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. पण धर्माच्या नावाने आम्हाला फसवलं गेलं आहे, अशी भावना ओबीसींमध्ये वाढीस लागली आहे. शिंदेंच्या शिवसेनेला या निर्णयाचा फायदा होणार, हे निश्चित आहे. पण, भाजपचे दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे. भाजपमधील मराठा लिडरशिप गर्भगळीत झाली आहे, त्यामुळे कालच्या निर्णयाचा फायदा एकनाथ शिंदेंना झाला आहे, तर भाजपचा मराठा आणि ओबीसी समाजातूनसुद्धा तोटा झालेला आहे.
बोल्ड आऊट झालेल्याची नावं कशाला घेता?
सगळे क्लीन बोल्ड झाले आहेत, बोल्ड आऊट झालेल्याची नावं कशाला घेता? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.