Maratha Reservation Protest Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : छगन भुजबळांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे कोल्हापुरात दहन

Rahul Gadkar

Maratha Reservation Protest : मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच छगन भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन करत पुतळा पेटवण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. मात्र तरीही हा पुतळा मराठा आंदोलकांनी पेटवला तसेच छगन भुजबळ यांच्या नावाने बोंबही मारली.

कालच्या बैठकीत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, ‘जरांगे -पाटील हे आता सर्वसामान्य कार्यकर्ते राहिले नाहीत. ते मराठा समाजाचे नेते आहेत. न्यायमूर्तींनी त्यांचा उल्लेख ‘सर ’असा केला तर भुजबळांना वाईट वाटण्यासारखे काय आहे? मंत्रिमंडळाचा निर्णय त्यांना बंधनकारक असताना त्यांनी आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. यातूनच मराठा समाजाबद्दल त्यांच्या मनात राग आहे हे दिसून येते. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.’

भुजबळांची स्क्रिप्ट भाजपची

ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, ‘छगन भुजबळ म्हणजे भाजपच्या हातातील खेळणे आहे. ईडीची भीती दाखवून भाजप भुजबळांकडून अशी वक्तव्ये करून घेत आहे. भुजबळांची स्क्रिप्ट भाजपची आहे.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT