Chhagan Bhujbal On Reservation : ओबीसी आरक्षणविरोधात याचिका; स्वत: भुजबळ उतरणार मैदानात...

Chhagan Bhujbal On Reservation : भुजबळ हे वकिलांशी आणि कायदेतज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणावर अध्ययन करणारे बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी ( इतर मागासवर्ग आरक्षण) आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. आता यात मोठी अपडेट येत आहे. या याचिकेच्या सुनावणी प्रक्रियेसाठी न्यायालयात राज्याचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. तसेच, भुजबळ हे वकिलांशी आणि कायदेतज्ज्ञांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता या विरोधातल्या याचिकेवर स्वत: छगन भुजबळ हस्तक्षेप करणार असल्याचे शक्यता आहे. (Latest Marathi News)

Chhagan Bhujbal
NCP News : दम असेल तर...; ग्रामपंचायत निकालानंतर शरद पवार गटाचे सरकारला खुले आव्हान

मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. यातच आता मराठा - ओबीसी नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला ओबीसीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्यास तीव्र विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळे हा वाद आता पुन्हा नव्याने पेटला आहे. राज्याचे दिग्गज नेते भुजबळ यात उतरल्यामुळे हा वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे.

ओबीसींना दिलेल्या आरक्षणाचा जो कायदा आहे, तो रद्द केला पाहिजे, या प्रवर्गातून दिलेल्या आरक्षणाचा फेरविचार करा, फेर सर्वेक्षण करा, अशी याचिका सराटे यांनी दाखल केली होती. २०११ च्यावेळी सुमारास या आरक्षणाला स्थगित आली होती, त्याच वेळी याचिका सादर करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितलं.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा 'ॲक्टिव्ह मोड'वर; म्हणाले, माझी प्रकृती आता व्यवस्थित...

राज्यात ओबीसींना हे जास्त प्रमाणात आरक्षण दिलं गेलेलं आहे. हे कायदेशीर नसून, घटनाबाह्य आहे. १९९४ या मध्ये एक अध्यादेश काढून ओबीसींच्या आरक्षणात वाढ करण्यात आली होती. हे सर्व कायद्याशी सुसंगत नसून, घटनाबाह्य पद्धतीने दिले असल्याचे याचिकेत म्हटलं आहे. १९९४ चा हा जीआर रद्द करणे गरजेचे आह, असे सराटेंची भूमिका आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com