Shambhuraj Desai, Manoj Jarange Patil. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर एका वाक्यात उत्तर द्या, मंत्री शंभूराजे देसाई असे का म्हणाले...

Shambhuraj Desai News : 20 तारखेला मनोज जरांगे- पाटील यांना मुंबईला येण्याची गरज लागणार नाही.

Vishal Patil

Karad : मुंबईत मराठा आरक्षणासाठी महामोर्चाची तयारी सुरू आहे. मराठा समाज आझाद मैदानावरून हल्लाबोल करणार आहे. सरकारपुढे कायदा आणि सुव्यवस्थेचे खूप मोठे आव्हान आहे. अशावेळी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांनी मनोज जरांगे- पाटील यांनी फुकलेलं रणशिंग योग्यच आहे, असे म्हटले होते. त्यावर आता शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रतिप्रश्न करत पलटवार केला आहे.

मराठा आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टात का टिकू शकलं नाही. तेव्हा कोणाचं सरकार होतं. या प्रश्नाचं पहिलं उत्तर विनायक राऊतांनी एका वाक्यात द्याव, असं आव्हानच मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

मनोज जरांगे- पाटील यांनी 20 तारखेला मुंबईला जाण्याचा नारा दिलेला आहे, त्याबाबत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. मी स्वतः त्यांना बैठकीचं पत्र दिलं होत, मात्र जरांगे- पाटील बैठकीला आले नाहीत. तरीसुध्दा ते ऑनलाईन ज्वाईन झाले. बैठकीतील आमची भूमिका त्यांना पटलेली आहे. त्यांनी सगेसोयरे या प्रमाणे सगळ्यांना दाखले देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत सगेसोयरे यांचा संदर्भ- व्याख्या कशी करायची यांचा अभिप्राय आम्ही मागितलेला आहे. याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे देसाई यांनी सांगितले. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझं वैयक्तिक मत असा आहे की 20 तारखेला मनोज जरांगे- पाटील यांना मुंबईला येण्याची गरज लागणार नाही. जरांगे पाटील यांना विनंती आहे. घाईगडबडीमध्ये कोणताही निर्णय घेऊन चालणार नाही. सध्या 85% हा विषय मार्गी लागलेला आहे. त्यामुळे सहकार्याची भूमिका त्यांनी घ्यावी, अशी विनंती मंत्री देसाई यांनी केली आहे.

आव्हाडांवर कायदेशीर कारवाई करा

जितेंद्र आव्हाड हे विधानसभा सदस्य आहेत. एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या खूप जवळ आहेत. अशा व्यक्तीने प्रभू श्रीरामाबद्दल मासांहर करायचं, अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे खूप चुकीचा आहे. ज्यांना आपण भक्तीभावाने पूजतो, त्यांना अभिषेक केल्यानंतर आपण ते पाणी सेवन करतो. अशा पुजनीय देवदेवातांच्या बाबतीत वक्तव्य करणं खेदजनक असून अशा वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणालेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT