Manoj Jarange Vs Bhujbal : मनोज जरांगेच्या 'वेड लागलंय' टीकेवर भुजबळ म्हणाले, 'हो मी 35 वर्षांपासून वेडा..'

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : "बिहार प्रमाणे महाराष्ट्रात जाती गणनाच करावी."
Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil and Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होऊन आंदोलनाचा इशारा देत, सरकारसमोर आव्हान निर्माण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती शेलक्या शब्दात टिका केली होती. मागील काही दिवसांपासून जरांगे आणि भुजबळ यांच्यात अत्यंत टोकाची टीका-टिपण्णी सुरू आहे. आज भुजबळ यांनी पुन्हा एकदा जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Supriya Sule News : भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे कॅबिनेटमध्ये कोणी ऐकत नाही..! सुप्रिया सुळे यांचा टोला..

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त भुजबळ यांनी फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन केले. छगन भुजबळ पुण्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात येत आहे 15 दिवसांत पूर्ण करणार, असं सांगण्यात येत आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये सर्वेक्षण होणार असेल, तर बिहार प्रमाणे महाराष्ट्रात जाती गणनाच करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

जरांगे यांच्याकडून होणाऱ्या सततच्या टिकेबाबत विचारले असता भुजबळ म्हणाले, "महाराष्ट्रातील जनता ठरवेल काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघाले आहेत. याबाबत आमचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय करायचे हे निर्णय घेती."

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
Maratha Reservation : मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीत जरांगे-पाटलांची ऑनलाईन हजेरी ?

काय म्हणाले होते मनोज जरांगे?

जरांगे यांनी भुजबळांना वेड लागले आहे, अशी टीका केली होती. याबाबत विचारलं असता भुजबळ म्हणाले, 'हो मला वेड लागले आहे. गेले 35 वर्ष मला ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी काम करण्याचा वेड लागलं आहे. फुले -शाहू- आंबेडकर यांच्या मार्गाने जाण्यासाठी मला वेड लागला आहे. हे वेड शेवटच्या श्वास पर्यंत जाणार नाही, असे भुजबळांनी ठणकावून सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com