CM Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maan Political News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी म्हसवडकरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Umesh Bambare-Patil

Maan Political News : म्हसवड नगरपरिषद हद्दीतील सिद्धनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या पूर्वेकडील, सातारा - पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या ४० गुंठे मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र स्मारक स्वरूपात सरकारने साकारावे, अशी मागणी माणदेश मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मराठा क्रांती मोर्चा Maratha Kranti Morcha व सकल मराठा समाज माणदेश (माण, खटाव, फलटण, माळशिरस सांगोला, आटपाडी, खानापूर, करमाळा, जत, माढा) यांच्या वतीने मुख्यमंत्री Eknath Shinde व उपमुख्यमंत्री यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड नगरपरिषदेच्या हद्दीत आणि नगरपरिषदेच्या अधिकारात असणारी सिद्धनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या पूर्वेकडील आणि सातारा - पंढरपूर रस्त्यालगतची चाळीस गुंठे जागा मोकळी आहे. या जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण जीवनचरित्र स्मारक रूपात सरकारने साकारावे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास भावी पिढीला समजावा अशा पद्धतीने या स्मारकाची उभारणी करावी. यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिल्पे उभारावीत. छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधित सर्व पुस्तकांनी सज्ज सुसज्ज ग्रंथालय, वाचनालय, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तयार करावे. Maharashtra Political News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन आदर्श पिढी निर्माण होईल. तसेच म्हसवड हे शहर माणदेशातील मध्यवर्ती शहर आहे. या शहरांमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे राहिले तर पर्यटनालासुद्धा मोठी चालना मिळेल. या माध्यमातून अर्थकारणाला बळ मिळेल. त्यामुळे सरकारने तत्काळ स्मारक उभारण्यासाठी मंजूरी देऊन स्मारकाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT