Shambhuraj Desai-Sanjay Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai - Fadnavis : भाजप खासदारांच्या वक्तव्यामुळे नाराज मंत्री शंभूराज देसाई फडणवीसांची भेट घेणार

BJP vs Shivsena : " माझी नाराजी मी जाहीरपणे माध्यमासमोर स्पष्ट करणार नाही. परंतु..."

Deepak Kulkarni

विशाल वामनराव पाटील   

Karad : कोयना धरणातील पाण्याचा वाद आता महायुती सरकारमधील नेत्यांच्यातच चांगलाच गाजू लागला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेकांकडून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई कोयना धरणातील पाणी सोडण्याबाबत अडमुठी भूमिका घेत असल्याचा काही दिवसापूर्वी आरोप होत होता.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर 2 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता महायुती सहकारमधील नेत्यांच्यात कोयना धरणातील पाण्यावरून आरोप- प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

सांगली जिल्ह्याचे खासदार आणि भाजपचे नेते संजय काका पाटील यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली होती. या टीकेवेळी कोयना धरण कुणाच्या सातबाऱ्यावर नाही, या वक्तव्यामुळे नाराज मंत्री शंभूराज देसाई उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. याबाबत मरळी - दौलतनगर (ता. पाटण) येथे ते माध्यमांशी बोलत होते.

शंभूराज देसाई म्हणाले, खासदार संजय काका पाटील (SanjayKakaPatil) यांच्याकडे पूर्ण माहिती नाही. मंत्री म्हणून मला राज्याचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करावे लागत आहे. कोयना धरणातील 67 टक्के पाणी पाॅवर जनरेशनसाठी आहे. तर केवळ 33 टक्के पाणी सिंचनासाठी, उद्योगासाठी आणि इतर वापरासाठी आहे. याबाबतचा मी 3-4 वेळा आढावा घेतला आहे. मला खेद वाटला की खासदार म्हणाले, कोयना धरण कुणाच्या सातबाऱ्यावर नाही. संजयकाका भाजपाचे खासदार आहेत, हे मान्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्हीही शिवसेनेचे आहोत. आमचे शिवसेना- भाजप आणि पवार गट असे आमचे एकत्रित सरकार आहे. खासदाराने आपल्याच सरकार मधील मंत्र्यावर टीका करणं योग्य नाही. तेव्हा उद्या मी मुंबईला जाणार असून माझी जी संजयकाका यांच्या वक्तव्याबाबत नाराजी आहे, ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त करणार आहे.

यापुढील काळात सातारा आणि सांगली जिल्ह्यात कोयनेच्या पाण्यावरून संघर्ष निर्माण होणार नाही, अशी आशा व्यक्त करूया. तसेच माझी नाराजी मी जाहीरपणे माध्यमासमोर स्पष्ट करणार नाही. परंतु, जी काही नाराजी आहे, ती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मी सांगेन, मंत्री देसाई म्हणाले.

काय म्हणाले होते खासदार संजयकाका पाटील?

सांगली येथे कृष्णा- कोयना पाण्यावरून भाजपचे खासदार यांनी थेट राजीनामा देण्याची तयारी दाखवत महायुती सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी संजय काका म्हणाले, देसाई (Shambhuraj Desai) यांनी पाणीवाटपात लुडबूड करू नये, ती आम्ही खपवून घेणार नाही. पाणी अडवून आमच्या आत्मसन्मानाला ठेच लावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. असे म्हणत कोयना धरणाचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT